Toilet Cleaning With Ice Cube Video: घरातील टॉयलेट सर्वच वापरत असले तरी स्वच्छ करताना मात्र अनेकदा कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे दुर्गंध आणि दुसरं म्हणजे हे डाग इतके चिवट असतात की स्वच्छ करताना दमछाक होऊन जाते. या दोन्ही प्रश्नांना सोडवण्यासाठी साहजिकच बाजारात अनेक प्रकारचे लिक्विड, पावडर उपलब्ध आहेत. पण या उत्पादनांचा वापर करताना एक आणखी नवा प्रश्न समोर येऊन उभा राहतो तो म्हणजे, स्वच्छता म्हटली की पाण्याचा वापर आलाच. जेव्हा केव्हा आपण टॉयलेटमध्ये पावडर किंवा लिक्विड टाकतो तेव्हा ते पसरवण्यासाठी सुद्धा पाणी लागतंच, बरं पाण्याचा नळ जरा सुरु केला की टाकलेली महागडी उत्पादनं सरळ वाहून जातात. अशावेळी तुमच्या फ्रीजमधील बर्फाचे क्युब्स तुमचा वेळ, पैसे आणि टॉयलेट स्वच्छ करण्याचा त्रास सगळं वाचवू शकतात. कसे ते पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओजमधून हा जुगाड सांगण्यात आला आहे. यात तुम्हाला सर्वात आधी टॉयलेटमध्ये भरपूर बर्फाचे क्यूब टाकायचे आहेत. शक्य असेल तर मोठे बर्फाचे तुकडे सुद्धा वापरू शकता, खरंतर भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये बर्फाचे मोठे तुकडे जास्त कामी येतील.

हे झाल्यावर आपल्याला या बर्फावर तुम्ही जे काही स्वच्छतेचे उत्पादन वापरणार आहात ते टाकायचे आहे.

बर्फामुळे हे उत्पादन नीट संपूर्ण टॉयलेटमध्ये पसरवून घेता येईल. मग बर्फ जसा हळू हळू वितळतो तसं त्या पाण्यासह टॉयलेटचे डाग सुद्धा हलके होऊन निघून जाऊ लागतात.

मग यानंतर साध्या ब्रशने आपण एकदा हलक्या हाताने घासून टॉयलेट स्वच्छ करू शकता. जर आपण बर्फ वितळण्याच्या आधी ब्रश वापरला तरी चालू शकतं कारण बर्फ स्वतः स्क्रब सारखं काम करू शकतं.

हे ही वाचा<< अंगठा व बोटांच्या अंतरावरून पुरुषांच्या लिंगाची लांबी खरंच मोजता येते? OMG 2 मधील या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात..

दरम्यान, तुम्ही जेव्हा पावडर किंवा लिक्विड वापरता तेव्हा टॉयलेटची दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाच्या साली सुद्धा टाकू शकता यामुळे पिवळट डाग सुद्धा निघून जाऊ शकतात आणि दुर्गंध सुद्धा गायब होतो.