दिवसें दिवस महागाई वाढतंच चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे मात्र हाल होत आहेत. सध्या बाजारातील टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहेत. देशात वेगवेगळ्या मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारात पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. आपल्याकडे कित्येक पदार्थ आहे ज्यामध्ये टोमॅटो सर्रास वापरले जाते. टोमॅटो खाद्यपदार्थांची चव वाढवते यामध्ये काही शंका नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टोमॅटोऐवजी इतर काही स्वस्त पर्याय वापरू शकता. त्यामुळे तुमच्या भाजीची चवही वाढेल आणि तुमचं बजेटही सांभाळता येईल. चला जाणून घेऊ या….
टोमॅटो सॉस
बाजारातमध्ये महागलेल्या टोमॅटो ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस भाज्यांमध्ये वापरू शकता. पण त्यामुळे भाज्यांची चव थोडी वेगळी असेल पण एकंदर चांगलीच असेल. तुमच्या बजेटमध्ये आणि प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला हा सोपा पर्याय आहे.
बीट
जर तुम्हाला भाजीला लाल रंग देण्यासाठी टोमॅटो वापरायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही बीट वापरू शकता. बीट जेवणाची चव वाढवेलच पण तुमचे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात …
चिंच किंवा आमसूल
तुम्हाला जर भाजीला आंबटपणा हवा असेल तर टोमॅटोऐवजी तुम्ही चिंच किंवा आमसूल वापरू शकता. चिंच आणि आमसूलमुळे तुमच्या भाजीची चव अप्रतिम होईल.
लाल शिमला मिर्ची
भाजीला टोमॅटोसारखा लाल रंग हवा असेल तर तुम्ही लाल शिमला मिर्च वापरू शकता.
हेही वाचा – Butter जास्त दिवस ताजे राहावे यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स, रंग अन् चव राहू शकतो चांगला!
भोपळा
जर भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी तुम्ही टोमटो वापरणार असाल तर त्याऐवजी तुम्ही भोपळा वापरू शकता. त्यामुळे भाजीला घट्टपणा येईल आणि तुम्हाला वेगळी चवही चाखता येईल.