रोजच्या आहारामध्ये टोमॅटोचा पुरेसा समावेश असल्यास महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या वजनामध्ये वाढ होऊन त्यांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, असे आतापर्यंतच्या संशोधनात आढळले होते. मात्र, टोमॅटो हे यावरील उत्तर ठरू शकते, असे नव्या संशोधनामुळे स्पष्ट झाले. रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात टोमॅटोचा समावेश केलेला असला, तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता मंदावते. टोमॅटोमुळे शरीरातील मेद आणि शर्करा यांचे योग्य संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळेच रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा आणि टोमॅटोयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा महिलांना फायदाच होतो, असे संशोधनात दिसून आले. रुटगर्स विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अदाना लानोस यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा