Tomato Storage Tips: अन्नाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. टोमॅटोचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो. कधी टोमॅटोचा वापर भाजी म्हणून केला जातो तर कधी ग्रेव्हीसाठी. अशा परिस्थितीत टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पावसाळ्यात टोमॅटोचे भाव वाढत असताना आता अनेकांनी टोमॅटो मोठ्या प्रमाणात साठवण्याची तयारी केली आहे. मात्र, टोमॅटोची योग्य प्रमाणात साठवणूक न केल्यास ते लवकर खराब होण्याचा धोका असतो. तुम्हालाही टोमॅटो मोठ्या प्रमाणात विकत घ्यायचे असतील आणि ते घरी ठेवायचे असतील तर आधी टोमॅटो योग्य प्रकारे साठवण्याच्या पद्धती जाणून घ्या, जेणेकरून टोमॅटो दीर्घकाळ टिकून राहतील आणि जेवणाची चवही वाढवत राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोमॅटो साठवण्याची योग्य पद्धत

प्लॅस्टिकच्या डब्यांचा करा वापर – टोमॅटो अनेकदा स्वयंपाकघरात साठवले जातात, परंतु स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही टोमॅटो जास्त काळ ठिकवण्यासाठी ठेवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी प्लास्टिकचा डबा किंवा जार वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी टोमॅटो नीट धुवा आणि स्वच्छ करा आणि सुती कापडाने पुसल्यानंतरच हवा बंद प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. घराच्या थंड भागात टोमॅटो ठेवा, पण, लक्षात ठेवा की टोमॅटो ठेवलेल्या ठिकाणी ओलावा नसावा.

हेही वाचा – Butter जास्त दिवस ताजे राहावे यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स, रंग अन् चव राहू शकतो चांगला!

मातीमध्ये साठवा – काही लोकांना हे जाणून थोडे आश्चर्य वाटेल, परंतु टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मातीचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो. टोमॅटो जमिनीत ठेवल्यास ते बरेच दिवस चांगले राहू शकतात. यासाठी स्वच्छ डबा घेऊन त्यात माती भरावी. यानंतर टोमॅटो मातीत दाबून ठेवा. मातीत किंवा टोमॅटोमध्ये पाणी राहू नये हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही मातीतून टोमॅटो काढता तेव्हा कोरड्या हातांनीच काढा.

हेही वाचा – १०० रुपये किलो झाला टोमॅटोचा भाव? भाजीसाठी वापरा ‘हे’ ५ स्वस्त पर्याय

मोकळ्या डब्याचा करा वापर – टोमॅटोला थोडी हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. हवेच्या संपर्कात आल्याने टोमॅटो लवकर खराब होत नाहीत. यासाठी कोणतेही उघडे भांडे किंवा डबा वापरला जाऊ शकताो. ज्या कंटेनरमध्ये टोमॅटो ठेवले आहेत त्याला थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवा, जेणेकरून टोमॅटो बराच काळ चांगला राहू शकेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomato storage tips for long time in monsoon season snk
Show comments