सतत ऑनलाईन? विश्रांती घ्या! जे लोक सोशल मिडियावर जास्तवेळ घालवत आहेत ते स्मृतिभ्रंशाला आमंत्रण देत असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे.
माहितीच्या महाजालाच्या काळात काही काळ ऑफलाईन राहणेच परवडणारे असल्याचे स्टॉकहोल्मच्या ‘केटीएच रॉयल तंत्रज्ञान’ संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे.
सोशल नेटवर्कींग साईटसवर सतत राहिल्यामुळे मेंदूचे स्वास्थ्य बिघडू शकते. सततच्या माहितीच्या माऱ्यामुळे मेंदूवर विपरित परिणाम होऊन, स्मृतिभ्रंश होऊ शकतो. माहितीच्या सततच्या माऱ्यामुळे मेंदूमध्ये कमी माहिती साठवली जात असल्याचे स्मृतिभ्रंशावर व मेंदूविकारांवर उपचार पध्दतींचे संशोधन करत असलेले ‘केटीएच’चे संशोधक एरिक फ्रानसेन म्हणाले.
सोशल मिडियावरून होणाऱ्या माहितीच्या माऱ्याचा परिणाम आपल्या सतत कार्यरत असणाऱ्या स्मृतीवर होत असल्याचे फ्रानसेन म्हणाले.
“सतत कार्यरत असणाऱ्या स्मृतीमुळे आपल्याजवळ असणारी माहिती फिल्टर होत असते. ज्यावेळी आपण इतरांशी संवाद साधतो त्या वेळी माहिती फिल्टर होऊन आपल्याला संवादासाठी आवश्यक असणारी माहितीचा पुरवठा मेंदू करत असतो. त्यामुळे आपण ऑनलाईन काम करू शकतो व ऑनलाईन मिळवलेली माहिती मेंदू साठवत असतो. परंतू त्याला मर्यादा आहेत,” असे फ्रानसेन म्हणाले.
“माणसाची कार्यरत स्मृती एकावेळी तीन ते चार बाबीच लक्षात ठेऊ शकते. ज्यावेळी आपण कार्यरत स्मृतीमध्ये जास्त माहिती घेण्याचे प्रयत्न करतो त्या वेळी स्मृती कामकरण्याचे थांबवते. फेसबुकवर ज्यावेळी आपण जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तुम्हाला आवश्यक असणारी फार थोडी माहिती मेंदूमध्ये साठवली जाते,” असे फ्रानसेन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा