Is Toor Dal Healthy For You: कितीही मांसाहार प्रेमी खवय्या असला तरी घरच्या आमटी भाताची सर कशालाच येणार नाही हे सर्वच जण मान्य करतील. अगदी बड्या बड्या हॉटेलमध्येही दाल तडका सारखे पदार्थ आवर्जून समाविष्ट केले जातात. एकूणच काय तर डाळीला पर्याय नाही. पण जर तुम्ही डाळीची निवडच चुकीची केली तर माझ्या डोक्याला ताप होऊ शकतो. बाजारातील प्रोटीनच्या नावावर विकल्या जाणाऱ्या केमिकलला आपल्या घरातील डाळी उत्तम पर्याय ठरतात त्यातही विशेषतः तूरडाळ ही जवळपास सर्वच घरांमध्ये शिजवली जाते. तूरडाळीत असणारे कॅल्शियम, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे पदार्थ शरीरासाठी गुणकारी ठरतात. वजन वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सर्वच कारणांसाठी तूरडाळ बेस्ट आहे. मात्र जर तुम्हाला खाली नमूद केल्यापैकी कोणतेही आजार असतील किंवा त्यासंबंधित लक्षणे शरीरात दिसून येत असतील तर तूरडाळीचे सेवन आपण आजच थांबवणे हिताचे ठरेल.

रुमेटोलॉजिस्ट डॉक्टर ग्रीष काकडे यांच्या माहितीनुसार, तूरडाळीचे सेवन काही व्यक्तींच्या आरोग्याला साजेसे ठरत नाही, उलट या डाळीमुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. काही आजारांमध्ये तर तूर डाळ अगदी विषाप्रमाणे काम करते. हे आजार नेमके कोणते व त्यांची लक्षणे काय हे आपण जाणून घेऊयात..

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

युरिक ऍसिड

युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या मंडळींनी तूरडाळीचे सेवन आवर्जून टाळावे. युरिक ऍसिडचा त्रास असल्यास आपल्याला प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन वर्ज्य असते. युरिक ऍसिडच्या रुग्णांच्या शरीरात टॉक्सिन्स तयार होत असल्याने हातापायांना सूज येणे, सांधे दुखी, जळजळ असे त्रास होऊ शकतात. तुरडाळीमुळे शरीरातील वात वाढून ऍसिडचे प्रमाणही बूस्ट होते. परिणामी तुम्हाला होणारा त्रास आणखी वाढू शकतो.

किडनीच्या संबंधित आजार

ज्या मंडळींना किडनीशी संबंधित तक्रारी असतात त्यांनी तुरीच्या डाळीचे सेवन टाळायला हवे. तुरडाळीतील पोटॅशियममुळे किडनीच्या आजरांचे प्रमाण वाढू शकते. तसेच मुतखड्याचा त्रास असल्यास गंभीर पोटदुखी होऊ शकते. तूरडाळ इतर डाळींच्या तुलनेत पचनास जड असल्याने शरीराला डिटॉक्स करणे कठीण होते.

हे ही वाचा>> उंचीनुसार तुमचे वजन परफेक्ट आहे का? इंच व किलोचं बेस्ट समीकरण जाणून घ्या, पाहा तक्ता

त्वचेच्या ऍलर्जी

तुम्ही अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर हातापायांना खाज येते अशी तक्रार करताना ऐकले असेल. रात्रीच्या जेवणात जर तुरडाळ वापरली असेल तर पचनक्रियेवर ताण येऊन त्याचा प्रभाव त्वचेवर दिसू लागतो. त्वचा लाल होणे, पुरळ येणे असेही त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नाजूक असेल तर तुरीच्या डाळीचे सेवन करणे टाळावे.

हे ही वाचा>> चहा कॉफीतील साखर चालेल पण मधुमेह व अतिवजन असल्यास ‘हे’ गैरसमज टाळाच!

आता आपण संपूर्ण लेखात तुरडाळ का खाऊ नये हे पाहिले पण जर समजा कधीतरी घरी पर्याय नसेल किंवा मूगडाळीचं वरण अगदीच पातळ होत असेल तर तुम्ही जितकी डाळ वापरता त्यांच्या एक चतुर्थांश तूरडाळ वापरू शकता. यामुळे निदान सेवन कमी प्रमाणात करण्याची सवय लागेल, व हळूहळू आपण तुरडाळीला पर्याय शोधू शकाल.

(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे, यासंदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता)

Story img Loader