Google’s Trending Travel Destinations Of 2023 : वर्ष २०२३ संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि सर्व जण २०२४ या नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानिमित्ताने तुमच्यापैकी बहुतेक जण आपल्या प्रियजनांसोबत जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्यासाठी सहलीची योजना आखतात. वर्षाचा शेवट आणि नववर्षाचे स्वागत आनंद व उत्साहाने करण्यासाठी या सहलीचे आयोजन केले जाते. आपल्या प्रियजनांसह जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणे हा एक वेगळा आणि आरोग्यदायी अनुभव असतो. त्यात दरवर्षी डिसेंबर (Year Ender 2023) महिन्यात गूगल सर्वांत जास्त सर्च केलेल्या सर्व गोष्टींची यादी जाहीर करते. त्यातीलच १० ठिकाणांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत; ज्याच्या मदतीने तुम्हालाही पुढील सुट्यांमध्ये कुठे फिरायला जायचे हे ठरवता येईल.

२०२३ मध्ये Google वर सर्वाधिक सर्च केलेली पर्यटनस्थळे

१) व्हिएतनाम

या वर्षी गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या ठिकाणांच्या यादीत व्हिएतनाम देश अव्वल स्थानावर आहे. आकर्षक समुद्रकिनारे, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, संस्कृती व नैसर्गिक सौंदर्यामुळे व्हिएतनाम हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. इतर ठिकाणांच्या तुलनेत हे ठिकाण सुरक्षित आणि प्रवासासाठी अनुकूल मानले जाते. व्हिएतनामला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते एप्रिल हा असतो जेव्हा हवामान आल्हाददायक असते, तेव्हा तुम्ही या ठिकाणी खूप सहज आणि आरामात फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
Goa Tourism
Goa Tourism : “मोफत जेवण आणि राहण्याची मागणी करून…”, गोव्याच्या पर्यटनावर टीका करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्स पर्यटन मंत्र्यांचं चोख उत्तर!
most google searched indian movies on ott
वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध
Image of Goa's crowded beaches or hotels
Goa Tourism : “गोव्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल”, इन्फ्लूएन्सर्सकडून चुकीचा प्रचार; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती

२) गोवा

या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर गोवा आहे; जो मुख्यत्वे त्याच्या अथांग पसलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे पर्यटक सुट्यांचा आनंद घेण्यासाठी वर्षभर या ठिकाणी येत असतात. गोव्याचे नाइट लाइफ अनुभवणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. गोव्यातील प्रमुख आकर्षणांमध्ये बॉम जीझस बॅसिलिका, फोर्ट अगुआडा, भारतीय संस्कृतीवरील मेणाचे संग्रहालय आणि हेरिटेज म्युझियम यांचा समावेश आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान गोवा फिरण्यासाठी खूप चांगला मानला जातो.

३) बाली

‘देवांची भूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाली या ठिकाणी तुम्हाला निखळ निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो. निळ्या समुद्राच्या काठावर वसलेले उलुवातू मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. त्याशिवाय माउंट बतूर आणि माउंट आगुंग या सुंदर बेटावर दोन सक्रिय ज्वालामुखी आहेत; जे इथले सर्वांत मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यासह पक्ष्यांच्या २८० प्रजाती, जगातील सर्वांत महागडी कॉफी कोपी लुवाक, तसेच स्कुबा डायव्हिंगची मजा लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकता.

४) श्रीलंका

२०२३ मध्ये गूगलच्या सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पर्यटनस्थळांमध्ये श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे. चहाचा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेत दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. डच शैलीतील घरे, हेरिटेज म्युझियम व हियारे रेनफॉरेस्ट यांचे सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राने वेढलेला श्रीलंका देश हा फिरण्यासाठी उत्तम मानला जातो. त्याशिवाय येथील निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरण सुखावणारे आहे.

५) थायलंड

गूगलच्या यादीत थायलंड पाचव्या क्रमांकावर आहे. थायलंडला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. येथील घनदाट जंगल, समुद्रकिनारे डोळ्यांना आनंद देतात. थायलंड हे फुकेत, ​​कोह पी, करावी व कोह सामुई यांसारखी लोकप्रिय ठिकाणे जगभरात प्रसिद्ध आहेत. विशेषत: येथील शॉपिंग सेंटर पर्यटकांना आकर्षित करते.

६) काश्मीर

‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणारे काश्मीर हेदेखील वर्षभरात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या पर्यटनस्थळांमधील सहावे ठिकाण आहे. बर्फाच्छादित डोंगररांगा, गोठलेले तलाव, सुंदर हाऊसबोट्स व हिमवर्षाव यांमुळे काश्मीरला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. काश्मीरचे अविस्मरणीय सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल.

७) कूर्ग

कूर्ग हे सुंदर धबधबे, किल्ले, तलाव, संग्रहालये आणि इतर अनेक गोष्टींनी नटलेले एक सुंदर ठिकाण आहे. कर्नाटकात वसलेले कूर्ग हे राज्यातील सर्वांत श्रीमंत हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.

८) अंदमान आणि निकोबार बेट

अंदमान आणि निकोबार बेटे ही निसर्गसौंदर्यात वेळ घालवण्यासाठी आणि रोमांचकारी साहसी गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी योग्य ठिकाणे आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांची ही पहिली पसंती असते.

९) इटली

इटलीने गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत नववे स्थान मिळवले आहे. सर्वांत लोकप्रिय ट्रॅव्हल हॉट स्पॉट्सपैकी इटली एक आहे, स्वादिष्ट इटालियन खाद्यपदार्थांपासून ते नयनरम्य ग्रामीण रस्त्यांपर्यंत इटलीत तुम्हाला अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील.

१०) स्वित्झर्लंड

सुंदर ठिकाणांमुळे स्वित्झर्लंड देश या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड हे नेहमीच अनके पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन राहिले आहे. इथले नैसर्गिक सौंदर्य, सर्वत्र पसरलेली बर्फाची चादर आणि दऱ्याखोऱ्या, डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात.

Story img Loader