समाजमाध्यमांनी सर्वसामान्य माणसालाही सार्वजनिकपणे आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ दिले आहे. त्यापैकी फेसबुक आणि ट्विटर ही समाजमाध्यमे भारतीयांत सर्वाधिक लोकप्रिय आहेत. फेसबुककडे मनोरंजन म्हणून पाहण्याचा वापरकर्त्यांचा दृष्टिकोन अद्याप फारसा बदललेला नाही. मात्र, ट्विटर हे गंभीर स्वरूपाची चर्चा किंवा मुद्दे मांडण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. साहजिकच ट्विटरवरील चर्चेतील मुद्दे, व्यक्ती, घटना देशातील मोठय़ा वर्गाच्या विचारांचा, मतांचा कल दर्शवतात. या पाश्र्वभूमीवर दरवर्षी ट्विटरच्या वतीने वर्षभरातील सर्वाधिक गाजलेले ट्वीट, चर्चेतील व्यक्ती, विषय यांचा तपशील प्रसिद्ध केला जातो. यंदाही १ जानेवारी ते १० नोव्हेंबपर्यंतच्या ट्वीट्सच्या विश्लेषणातून ट्विटरने अहवाल जाहीर केला आहे. पाहुयात याच अहवालानुसार मागील वर्षभरात देशात सर्वाधिक चर्चा झालेले हॅशटॅग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा