2018 या वर्षात एसयुव्ही, सिडान आणि हॅचबॅक अशा सर्व प्रकारातील अनेक कार लाँच झाल्यात. याशिवाय लग्जरी कारच्या सेगमेंटमध्येही बऱ्याच कार लाँच झाल्या. तसंच या वर्षामध्ये अनेक उत्तम Performance असलेल्या कार देखील बाजारात आल्या आहेत. अशाच दमदार Performance असलेल्या टॉप 5 कारबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Ferrari Portofino –
फेरारी पोर्टोफिनो ही मेटल फोल्डिंग रुफ(वरील भाग) असलेली कंपनीची एंट्री लेवल कार आहे. या कारचं डिझाइन आकर्षक असून यामध्ये ट्विन-टर्बो V8 इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 600bhp ची पावर जनरेट करतं. आतापर्यंतची फेरारीची सर्वाधिक आकर्षक कार असंही फेरारी पोर्टोफिनोला म्हटलं जातंय.
Aston Martin Vantage –
ख्यातनाम ब्रिटिश कार निर्मात्या कंपनीची ही सर्वात नवी कार असून यामध्ये AMG GT रेंजच्या आधारे या कारची निर्मिती करण्यात आलीये. यामध्ये 4-लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन असून ते 503bhp ची पावर आणि 685Nm टॉर्क जनरेट करतं. 8 स्पीड गिअरबॉक्स असलेलं हे इंजिन रिअर व्हिल्सला पावर सप्लाय करतं. 0 ते 100 किमी वेग पकडण्यास या कारला केवळ 3.5 सेकंद लागतात. 315kmph इतका या कारचा टॉप स्पीड आहे.
Mercedes-AMG E63s 4MATIC+
मर्सिडिजच्या या नव्या कारला वेगाच्या बाबतीत Beast असंही म्हटलं जातं. यामध्ये 4.0 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन असून ते 603bhp पावर आणि 850Nm टॉर्क जनरेट करतं. 0 ते 100 kmph चा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 3 सेकंद लागतात. 250 kmph इतका कारचा टॉप स्पिड असून ड्रायव्हर पॅकेजसह या कारचा टॉप स्पीड 300kmph इतका आहे.
BMW M5 –
नवी बीएमडब्ल्यू जुन्या मॉडलच्या तुलनेत लांब आणि जास्त पावरफुल आहे. यामध्ये 4.4 लिटर ट्विनOटर्बो V8 इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 591bhp पावर आणि 750Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 0 ते 100 kmph चा वेग अवघ्या 3.4 सेकंदात पकडतं. टॉप स्पिडच्या बाबतीत ही कार मर्सिडिजच्या E63 कारला तगडी टक्कर देते. याशिवाय ही सर्वात पहिली ऑल-व्हिल-ड्राइव्ह M5 आहे.
Audi RS5 –
नव्या Audi RS5 मध्ये ट्विन-टर्बोचार्ज्ड V6 इंजिन देण्यात आलं असून हे इंजिन 444bhp पावर आणि 600Nm टॉर्क जनरेट करतं. या कारला 0 ते 100 kmph वेग पकडण्यासाटी केवळ 3.9 सेकंद लागतात. 250kmph इतका या कारचा टॉप स्पीड आहे.