अनेकदा लॅपटॉप बराच वेळ चार्ज केल्यानंतरही लगेच डिस्चार्ज होतो. त्यामुळे महत्वाचे प्रेझेन्टेशन किंवा काम असल्याने लॅपटॉप चार्ज होताना काम करावे लागते. अशाप्रकारे लॅपटॉप चार्ज होताना काम करणे धोकादायक ठरु शकते. म्हणूनच आम्ही सांगत आहोत लॅपटॉपची बॅटरी जास्तीत जास्त काळ टिकवण्याच्या काही खास टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

> स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपमध्येही स्क्रीनमुळे मोठ्या प्रमाणात बॅटरी ड्रेन होते. त्यामुळेच लॅपटॉपच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा. जर लॅपटॉपच्या कीबोर्डचा वापर होणार नसेल तर कीबोर्डची बॅकलाईटही बंद करु शकतो. व्हिडिओ किंवा सिनेमा पाहताना कीबोर्ड बॅकलाईट बंद करु शकता.
कीबोर्ड लाईट बंद करण्यासाठी
Start >> Control Panel >> windows mobility center >> click icon Keyboard Brightness on
Set as off/on/dim keyboard backlight.

> यूएसबी पोर्टच्या माध्यमातून कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमुळेही बॅटरी पटकन डिस्चार्ज होते. त्यामुळे काम झाल्यानंतर माऊस, पेनड्राइव्हसारखे डिव्हाइस डिस्कनेक्ट करावेत. त्यामुळे बरीच बॅटरी वाचते.

> लॅपटॉप जास्त गरम झाल्यास तो थंड करण्यासाठी लॅपटॉपमधील इंटर्नल फॅन्स जास्त वेगाने फिरतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीचा वापर होतो. अनेक लॅपटॉपचे कुलिंगपॅड्सही लॅपटॉपच्या बॅटरीवरच काम करतात. त्यामुळे लॅपटॉप थंड जागी ठेवावा. खास करुन लॅपटॉपचा बेस म्हणजेच खालचा भाग हवेशीर जागी असेल याची काळजी घ्यावी. त्यामुळे लॅपटॉप गरम झाला तरी तो नैसर्गिक हवेने थंड होतो किंवा त्यामधील उष्णता बाहेर पडण्यासाठी जागा उपलब्ध होते आणि ती उष्णता साठून न राहिल्याने इंटर्नल फॅन्सवरील ताण कमी होतो.

वाचा: मोबाईलमधले काँटॅक्ट्स उडालेत? असे करा रिस्टोअर

> विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या लॅपटॉपमध्ये बिल्ट-इन पॉवर प्लॅन सेटिंगचा पर्याय उपलब्ध असतो. यामधून तुम्ही लॅपटॉपच्या काही विशिष्ट भागांना कधी बॅटरीचा पुरवठा बंद करायचा हे ठरवू शकता. हा पर्याय वापरून तुम्हाला डिस्प्ले तसेच हार्ड डिस्क किंवा यूएसबी पोर्टला होणारा बॅटरीचा पुरवठा बंद करता येतो.

> बॅटरीशी संबंधित अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. हे अॅप्लिकेशन्स बॅटरीबद्दलची सर्व माहिती तुमच्या होम स्क्रीनवर उपलब्ध करुन देतात. यात बॅटरी कधी चार्ज केली ती किती वेळ चालेल कशासाठी ती सर्वाधिक वापरली जात आहे अशी बरीच माहिती समजते. या माहितीनुसार आपण लॅपटॉपच्या बॅटरीचा जास्तीत जास्त वापर करु शकतो. तसेच हे अॅप्स सीपीयू आणि हार्डड्राइव्हचे तापमानही सांगतात. त्यामुळे ओव्हर हिटिंग कधी होते हे समजते. याचा बॅटरीच्या सुनियोजित वापरासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो.

‘असा’ मिळवा मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा जाणून घ्या

सावधान! स्मार्टफोनच्या अती वापराने हे पाच आजार होऊ शकतात