भारतातील प्रत्येक शहर आणि राज्य या ना त्या कारणाने जगभर प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, हिमाचल आणि उत्तराखंड सुंदर दर्‍यांसाठी प्रसिद्ध आहेत, तर राजस्थान आणि मध्य प्रदेश जगप्रसिद्ध किल्ले आणि राजवाड्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतातील ओडिसा हे अध्यात्मिक केंद्र आणि अद्भुत आणि सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगत असल्याने या राज्यातही मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

सध्या ओडिसातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या मयूरभंजची जगभरात चर्चा होत आहे. ओडिशातील मयूरभंज हे असेच एक ठिकाण आहे जे आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. हिरवागार निसर्ग, प्राचीन मंदिरे, खळखळ वाहणारे शुभ्र धबधबे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याने TIME मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत स्थान मिळवले आहे. प्रतिष्ठित यादीमध्ये केवळ दोन भारतीय ठिकाणे आहेत – ते म्हणजे लडाख आणि मयूरभंज. लडाख हे प्रवासी उत्साही लोकांमध्ये आधीच एक लोकप्रिय ठिकाण आहे, तर मयूरभंज हे निश्चितच या वर्षी तुमच्या प्रवासाच्या योजनांमध्ये एक मनोरंजक पर्याय ठरू शकतो.

सिमिलपाल नॅशनल पार्क पासून जिथे तुम्ही बंगाल टायगर पाहू शकता, मोहक भीमकुंड धबधबा, अंबिका मंदिर ते लुलुंग पर्यंत, मयूरभंजमध्ये फिरण्यासाठी आणि तुमच्यातील प्रवास उत्साही लोकांना संतुष्ट करण्यासाठी बरेच काही आहे. निसर्गाचे अतुलनीय सौंदर्य, समृद्ध वनस्पती आणि प्राणी आणि प्राचीन मंदिरे यांचा अभिमान बाळगून, मयुरभंजने या वर्षी भेट देण्याच्या जगातील सर्वोत्तम 50 ठिकाणांच्या प्रतिष्ठेच्या यादीत स्थान मिळवले आहे.

मयूरभंजला जायचे आहे का? तुमच्यासाठी येथे एक टॅव्हल गाईड आहे.

मयुरभंजमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे

सिमिलपाल नॅशनल पार्क

सिमिलपाल नॅशनल पार्कला भेट दिल्याशिवाय तुमची मयूरभंज प्रवासच पूर्ण होणार नाही. हे जिल्ह्याचे परिपूर्ण रत्न आहे जे तुम्हाला निसर्गाच्या भव्य सौंदर्याशी जोडते. बारीपाडा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 17 किमी अंतरावर असलेले हे अतिशय सुंदर आहे. या सुंदर उद्यानात व्याघ्र प्रकल्पही आहे. सिमलीपाल नॅशनल पार्क हे हिरवेगार जंगले आणि प्राणी तसेच नामशेष होणाऱ्या वनस्पतींसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हे स्थलांतरित पक्ष्यांचे घर देखील मानले जाते. विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंचे घरांपासून ते धबधबे, कुरण आणि घनदाट जंगलाचा समावेश आहे. तुमच्या आत्माला शांती देणाऱ्या समाधानकारक आणि नयनरम्य दृश्यांमध्ये तुम्ही नक्कीच हरवून जाल. तुम्ही जीप सफारी करू शकता किंवा २-३ दिवसांच्या सिमिलपाल नेचर कॅम्पची निवड करू शकता. या सुंदर उद्यानात फिरण्याची मजा वेगळीच असते. याशिवाय तुम्ही येथे ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.

सिमिलपाल नॅशनल पार्क (Image Credit -mayurbhanj.nic.in/ Govt of odisa /)

लुलुंग

लुलुंग हे एक अप्रतिम पिकनिक स्पॉट आहे जिथे तुम्ही खळखळ वाहणारे प्रवाह आणि निर्सगाच्या सानिध्यातील पायवाटेचा समावेश असलेल्या सुंदर दृश्यांचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता. हे ठिकाण सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते.

व्हिसा नसेल तरी भारतीय फिरु शकतात ‘हे’ ४८ सुंदर देश, जाणून घ्या काय आहे जुगाड?

बरेहीपाणी आणि जरोंडा धबधबा

सिमिलपाल राष्ट्रीय उद्यानात स्थित, हे भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहेत. बरेहीपानी धबधबा हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. होय, जेव्हा 400 मीटरपेक्षा जास्त उंचीवरून पाणी जमिनीवर पडते. उंचावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचे दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. घनदाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. पावसाळ्यात येथे सर्वाधिक पर्यटक येतात.

बरेहीपाणी धबधबा

देवकुंड आणि अंबिका मंदिर

देवकुंड हे मयूरभंजमधील आणखी एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. देवकुंड धबधबाही एक सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. या ठिकाणाचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की हा ओडिशाचा अनमोल खजिना मानला जातो. या ठिकाणचे सौंदर्य तुमचे मन नक्कीच जिंकेल. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या प्राचीन अंबिका मंदिरालाही तुम्ही भेट देऊ शकता जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. १९४० च्या सुमारास मयूरभंजच्या राजाने हे मंदिर बांधले, असे या मंदिराबद्दल मानले जाते. तुम्ही देवकुंड धबधबा आणि मंदिराभोवती सुंदर फोटोग्राफी करू शकतो.

देवकुंड धबधबा आणि प्राचीन अंबिका मंदिर (Image Credit -mayurbhanj.nic.in/ Govt of odisa )

जगन्नाथ मंदिर

मयूरभंजमधील हरिबलदेव मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर कोरापुटमधील पुरी आणि श्रीक्षेत्रानंतर ओडिशातील तिसरे सर्वात लोकप्रिय जगन्नाथ मंदिर आहे. वार्षिक रथयात्रा, मुख्यतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली जाते, हे एक प्रमुख आकर्षण आहे.

मयूरभंज एक स्थान आहे जेथे दररोज लाखों नागरिक आणि पर्यटक फिरण्यासाठी येतात. मयूरभंजला भेट देताना तुम्ही भीमकुंड, खिचिंग आणि रामतीर्थलाही भेट देऊ शकता.

आता नेपाळमध्ये सोलो ट्रेकिंग करण्यास बंदी; १ एप्रिलपासून लागू होणार नियम

मयुरभंजला कसे जायचे

मयूरभंजला भेट देण्यासाठी तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करू शकता.

जर तुम्हाला ट्रेन घ्यायची असेल तर तुम्हाला देशातील प्रमुख शहरांमधून बारीपाड्याला जाण्यासाठी नियमित ट्रेन सहज मिळू शकतात. कोलकाता, दिल्ली इत्यादी राज्यांतून सहज उपलब्ध ट्रेन उपलब्ध होतात.

जर तुम्ही विमानाने येणार असाल तर कोलकाताचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बिजू पटनायक विमानतळ, भुवनेश्वर हे मयूरभंजच्या जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. दोन्ही विमानतळ मात्र मयूरभंजपासून 200 किमी अंतरावर आहेत. त्यावर रस्त्याने प्रवास करावा लागेल.

याशिवाय जर तुम्हाला रस्त्याने जायचे असेल तर जमशेदपूरपासून 163 किमी, बालासोरपासून बारीपाडापर्यंत 60 किमी आणि खरगपूरपासून 103 किमी अंतरावर आहे.

बालीमध्ये बाईक चालविण्यास किंवा भाड्याने घेण्यास पर्यटकांवर का घातली जातेय बंदी; जाणून घ्या

मयूरभंजला भेट देण्याची उत्तम वेळ

या रमणीय ठिकाणी जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण तापमान सहसा अनुकूल असते.