नवे वर्ष साजरे करण्यासाठी आणि ख्रिसमसनिमित्त अनेकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी शिमला, कुलू- मनाली, काश्मीरमध्ये जाण्याचा प्लॅन केला असेल, त्यानुसार तिकीट आणि इतरही नियोजन केले असेल, काहींच्या तर बॅगही पॅक करून झाल्या असतील. विशेषत: लहान मुले बरोबर असतील, तर आधीच सर्व तयारी करून ठेवणे फायद्याचे असते. दरम्यान, सर्व सामान पॅक करण्याबरोबर तुम्हाला प्रवासाला निघण्याआधी काही खाद्यपदार्थ पॅक करणेही फार गरजेचे असते. कारण- बऱ्याचदा ट्रॅफिक जाम आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीमुळे तुम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचण्यास फार उशीर होतो. अशा वेळी भूक लागू नये यासाठी काही खाद्यपदार्थ नेहमी तुमच्या बॅगेत ठेवणे फार गरजेचे आहे; ज्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रवासाचा आरामात आणि व्यवस्थित आनंद घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रॅनोला बार किंवा ड्रायफ्रुट्स बार

प्रवासाला निघण्याआधी तुम्ही खाण्यासाठी ग्रॅनोला बार किंवा ड्रायफ्रुट्स बार घेण्यास विसरू नका. हा पदार्थ तुम्ही घरीच बनवू शकता किंवा बाहेरून विकतही घेऊ शकता. त्यामुळे भूक तर भागेलच; पण प्रवासादरम्यान तुम्ही अनारोग्यकारी खाण्यापासून दूर राहू शकाल.

भाजलेली बडीशेप आणि जवस

भाजलेली बडीशेप आणि जवस एका कोरड्या हवाबंद बरणीत भरून ठेवा. हे पदार्थ पचण्यास मदत करतात आणि पचनाशी संबंधित समस्या दूर ठेवतात. जर तुम्ही थंड वातावरणाच्या ठिकाणी जात असाल, तर भाजलेली सेलेरीबरोबर ठेवणे फायद्याचे असते. त्यामुळे शरीर आतून उबदार राहते आणि पचनाशी समस्या टाळता येतात.

आवळा कँडी

आवळा कँडी बाजारात सहज उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान त्या बरोबर ठेवणे फार गरजेचे आहे. कारण- यामुळे प्रवासादरम्यान ‘मोशन सिकनेस’सारख्या समस्या टाळण्यास मदत होते.

भाजलेले चणे आणि शेंगदाणे

भाजलेले चणे आणि शेंगदाणे प्रवासादरम्यान खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. त्यामुळे तुम्हाला चहा-कॉफीबरोबर खाण्याचा आनंद तर मिळेलच; पण त्याचबरोबर पोट हलके होऊन तुमची भूकही भागेल.

भाजलेला मखाणा

प्रवासादरम्यान लहान मुले बरोबर असतील, तर त्यांच्यासाठी भाजलेला मखाणा घ्यायला विसरू नका. हे हलके स्नॅक्स मुलांना त्यांच्या वेळेवर खाण्यासाठी देऊ शकता. हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे; जो बॅग पॅक करण्यापूर्वी आठवणीने घेतला पाहिजे.