Monsoon Travel Tips: पावसाळा खूप आल्हाददायक असतो. त्यामुळेच या ऋतूत प्रवासाची इच्छा अधिक वाढते. या काळात लोक वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात. पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अजूनच बहरत. हिरवीगार झाडी, बाहेरचा थंडावा यामुळे पावसाळ्यात प्रवास करण्याची इच्छा सगळ्यांना असते. मात्र, या काळात प्रवास करताना अनेक समस्या येत असतात. ज्यामुळे तुमचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो. मात्र, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा प्रवास सोपा बनवू शकता। असं केल्याने, तुम्हाला तुमच्या प्रवासाचा आनंद अनुभवता येईल. तर जाणून घ्या पावसाळी प्रवासाच्या काही सोप्या टिप्स.
मान्सून प्रवास टिप्स (Monsoon Travel Tips)
१) फर्स्ट एड किट
पावसाळ्यात प्रवास करताना, फर्स्ट एड किट कायम सोबत ठेवा. पावसाळ्यात प्रवास करताना कधीही तुम्हाला त्याची गरज भासू शकते. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने वाढते. काही वेळा थंडीमुळे लोकही अडचणीत येतात. त्यामुळे नेहमी प्रथमोपचार पेटी सोबत ठेवा. ज्यामध्ये ताप, खोकला, सर्दी यावर औषधें तसंच ड्रेसिंग टेप किंवा बँड जरूर ठेवा. याने नक्कीच तुमच्या प्रवासात मदत होईल.
( हे ही वाचा: पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया झपाट्याने पसरतो; अशाप्रकारे काळजी घ्या)
२) योग्य कपडे निवडा
या ऋतूत योग्य कपडे निवडणे महत्त्वाचे आहे. पावसात आंघोळ करण्याची मजा काही वेगळीच आहे, पण तुम्ही जर मुसळधार पाऊस पडत असलेल्या भागात जात असाल तर पटकन सुकणारे कपडे सोबत ठेवा, विशेषत: सिंथेटिक फॅब्रिकचे कपडे. याने ते कपडे लगेच सुकतीलही किंवा त्यात पाणी जमून राहणार नाही. तसंच प्रवास करतेवेळी जास्तीचे कपडे सोबत घ्या. जर अचानक तुम्ही पावसात भिजलात तर तुम्हाला हे जादाचे कपडे कामी येतील.
३) वॉटरप्रूफ बॅग
पावसाळ्यात प्रवास करतेवेळी योग्य बॅग निवडणे गरजेचं असतं. त्यामुळे प्रवासात तुमच्या सामानाची काळजी घेण्यासाठी कायम वॉटरप्रूफ बॅग निवडा. याने जर पावसात चुकून बॅगेवर पाणी पडलं, तर त्यामुळे तुमचे कपडे खराब होणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या वस्तूंचे नुकसान होण्यापासून वाचवू शकता. त्यामुळे पावसाळ्यात प्रवास करतेवेळी ही विशेष काळजी घ्या.
( हे ही वाचा: पावसाळ्यात घ्या पायांची खास काळजी, जाणून घ्या या ५ टिप्स)
४) योग्य ठिकाण निवडा
प्रवासात विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी योग्य ठिकाण निवडणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात प्रवास करतेवेळी, हवामानानुसार योग्य जागा निवडा. अशावेळी हिल स्टेशनवर जाणे सहसा टाळावे. तिथे असलेल्या हवामानामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रवास करताना हवामानानुसार योग्य जागा निवडा.
५) खाद्यपदार्थ सोबत ठेवा
पावसाळ्यात प्रवास करतेवेळी, काही स्नॅक्स तुमच्यासोबत कायम ठेवा. कधी कधी अतिवृष्टीमुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही कठीण होते. त्यामुळे सोबत ठेवलेला स्नॅक्स तुम्हाला त्यावेळी कामी पडू शकतो. किंवा जर तुम्ही पावसाळ्यात प्रवास करतेवेळी अचानक कुठे अडकलात, तर सोबत असलेले स्नॅक्स तुम्हाला उपयोगाचे पडू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात प्रवास करतेवेळी स्नॅक्स कायम सोबत ठेवा.
( हे ही वाचा: पावसाळ्यात बदला तुमची जीवनशैली, जाणून घ्या ‘या’ उपयुक्त टिप्स)
६) पॉवर बँक सोबत ठेवा
कोणत्याही प्रवासात पॉवर बँक सोबत ठेवणे फार महत्वाचे आहे. जर प्रवासात अचानक तुमचा फोन वैगरे बंद पडला, तर सोबत असणारा पॉवर बँक तुमच्या कामी येऊ शकतो. पावसाळ्यात प्रवास करतेवेळी, अचानक तुम्ही कुठेही अडकलात, तर त्यावेळी तुमच्या सोबत पॉवरबँक सोबत असणे कधीही हिताचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवास करतेवेळी पॉवरबँक नेहमी सोबत ठेवा.