Trigrahi Yoga in Capricorn 2022 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि २०२२ हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार हा प्रश्न सर्वांच्या मनात येऊ लागला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. तसेच, जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व १२ राशींच्या लोकांवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार २०२२ मध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे, ज्याचा थेट परिणाम मनुष्याच्या जीवनावर होणार आहे.
त्रिग्रही योग केव्हा तयार होईल हे जाणून घ्या
२०२२ मध्ये मकर राशी या शनीच्या राशीत त्रिग्रही योग असणार आहे. शनी ग्रह आधीच मकर राशीमध्ये स्थित आहे, ५ जानेवारीला बुध देखील या राशीत पोहोचेल आणि त्यानंतर १४ जानेवारीला सूर्य देखील मकर राशीत जाईल. मकर राशीत शनी, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल, जो शुभ मानला जात नाही. कारण शनी आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत ४ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. जाणून घ्या त्या राशींबद्दल…
कन्या:
या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पोट आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. या कारणास्तव, अन्नाबद्दल खूप काळजी घ्या. विशेषतः बाहेरचे अन्न टाळावे. कोणत्याही मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. पालकांच्या तब्येतीची चिंता असू शकते. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही घर बदलू शकता.
तूळ:
या राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कठीण असू शकतो. त्रिग्रही योग या लोकांसाठी मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. मानसिक तणाव वाढेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. हॉस्पिटल भेटी देखील आवश्यक असू शकतात. घसा, छाती आणि पाठदुखीची समस्या असू शकते.
आणखी वाचा : Relationship Tips : पत्नीने चुकूनही पतीसमोर ‘या’ पाच गोष्टी करू नयेत, नात्यात दुरावा येऊ शकतो
धनु:
जानेवारी महिना या लोकांसाठी काही अडचणी वाढवू शकतो. त्रिग्रही योगामुळे वैवाहिक जीवनात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पोटाची किंवा रक्तदाबाची समस्या असू शकते. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात गुंतलेले असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही नोकरीही बदलू शकता.
आणखी वाचा : Shani Sade Sati 2021 : शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रस्त असाल तर लगेच हे उपाय करून पाहा!
मकर:
मकर राशीच्या लोकांना काहीही साध्य करण्यासाठी अनेक पटींनी काम करावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी जाणवेल. खर्च वाढतील, या काळात आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते. आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. वाताचे आजार आणि सांधे रोगाशी संबंधित समस्या असू शकतात. यावेळी, तुम्ही जमीन-मालमत्तेचे व्यवहार करू शकता.