तंबाखूच्या करांमध्ये तिप्पट वाढ केल्यास जगभरातील २० कोटी अकाली मृत्यू टळू शकणार असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिध्द झाले आहे. तंबाखू धुम्रपानामुळे होणाऱ्या फुप्फूसाच्या कर्करोग व इतर रोगांमुळे या शतकामध्ये जगभरात २० कोटी अकाली मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या करांमध्ये तिप्पट वाढ केल्यास सर्वच तंबाखूजन्य पदार्थाच्या किमती दुप्पट वाढून एका पातळीवर येतील. वाढलेल्या किमतींमुळे पहिल्या टप्प्यातील धुम्रपान करणारे त्यापासून फारकत घेतील. महाग उत्पादन असल्याने लहान व किशोरवयात व्यसनांकडे वळणारा वर्ग त्यापासून दूर राहील. असा दावा  संशोधकांच्या गटाने केला आहे. विषेश म्हणजे या संशोधन गटातील एक संशोधक भारतीय वंशाचा आहे.              
याचा फायदा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास व विकसनशिल देशांना होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ज्या देशांमध्ये महाग सिगरेटला अनेक तंबाखूजन्य पर्याय उपलब्ध आहेत त्या ठिकाणी धुम्रपानाचे प्रमाण सातत्याने वाढत आसल्याचे मिखेल रूग्णालयाच्या जागतिक आरोग्य संशोधन केंद्राचे संचालक प्रकाश झा यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या स्थिर असणाऱ्या देशांना देखील या धोरणाचा फायदा होईल असे झा यांनी म्हटले आहे. तंबाखूच्या करांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करणे हा धुम्रपान कमी करण्याचा सर्वांत सरळ व सोपा उपाय असल्याची नोंद या संशोधकांना केली आहे. धुम्रपानामुळे सरासरी १० वर्षाचे आयुष्यमान कमी होते. धुम्रपान करणाऱ्या बऱ्याच जणांचा मृत्यू अकाली होत असल्याचे या संशोधकांनी दाखवून दिले आहे.       

Story img Loader