Denim Styling Tips: वेगवेगळे स्टायलिश लूक करायला प्रत्येकाला आवडत. आपण प्रत्येक लूक मध्ये सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटतं असत. कपड्यांमध्ये अनेक प्रकार आहे. मात्र, डेनिमचा ट्रेंड सध्या चांगला चाललाय. अनेकजण डेनिमप्रेमी आहेत. डेनिमची जीन्स, स्कर्ट, जॅकेट यांसारख्या गोष्टी वापरणं अनेकांना आवडतं. मात्र, तुम्ही देखील डेनिम प्रेमी असाल, त्यामध्ये देखील असलेले नवीन स्टायलिश लूक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. डेनिममध्ये देखील अनेक नवीन असे पॅटर्न आले आहेत की जे तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया डेनिमचे काही स्टायलिश लूक. जे वापरून तुम्ही वेगळा लूक तयार करू शकता.
मस्त रंग
जर तुम्हाला काळा, निळा, पांढरा याशिवाय इतर रंग वापरायचे असतील तर तुम्हाला डेनिममध्ये अनेक रंग मिळतील. क्रिम केशरी, हिरवा, पिवळा रंग तुमची शैली आणखी वाढवेल. याशिवाय प्रिंटेड डेनिम ट्राउझर्सही तुम्हाला सहज मिळतील. या नवीन स्टाइल्स वापरून तुमचा चांगला स्टायलिश लूक बनेल.
( हे ही वाचा: शिफॉन साडी नेसायला आवडते?; जाणून घ्या कशी घ्यावी काळजी)
फ्लेर्ड डेनिम्स
हिवाळा आणि उन्हाळा या दोन्हींसाठी हे रुंद पायांचे सिल्हूट एक उत्तम पर्याय आहे. लांब हेमलाइनवर तुम्ही एखादा चांगला क्रॉप टॉप, हॉल्टर टॉप किंवा व्ही-नेक टीसह रुंद-लेग पॅंट घालू शकता. हा तुम्हाला दररोज पेक्षा एक चांगला लूक देईल. तसंच तुम्ही इतरांपेक्षा एक वेगळा लूक तयार करू शकता.
डार्क वॉश
डार्क वॉश ही स्टाईल १९९० च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. आता पुन्हा २०२२ च्या उन्हाळ्यात गडद इंडिगो डेनिम पुन्हा दिसू लागले आहे. जर तुम्ही हा पॅटर्न याआधी कधी वापरला नसेल, तर या वर्षी नक्की करून पहा. तुम्हाला यामध्ये एक चांगला लूक मिळेल. तसंच तुम्ही या डार्क वॉश मध्ये खूप उठून दिसाल.
( हे ही वाचा: चांदीचे दागिने काळे पडलेयत ? ‘या’ पद्धतींनी चमक परत आणा)
डेनिम मॅक्सी स्कर्ट
डेनिम मॅक्सी स्कर्ट हा तुम्हाला वेगळा लुक देण्यासाठी पुरेसा आहे. हा स्कर्ट स्नीकर्ससोबत घालता येतो, पण जर तुमची उंची चांगली असेल तर ती फ्लॅट फूटवेअरसोबतही घालता येते. दररोजच्या लुक्समध्ये जर तुम्ही कंटाळलात असाल, तर हा डेनिमचा नवीन स्टायलिश लूक तुम्हाला एक हटके लूक देईल.
डेनिम जॅकेट
कोणत्याही साध्या ड्रेसला स्टायलिश बनवण्यासाठी डेनिम जॅकेटही पुरेसे आहे. डेनिम जॅकेटसह तुम्ही मॅक्सी ड्रेस किंवा टॉप स्टाइल करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात किंवा हलक्या हिवाळ्यातही ही शैली खूपच आरामदायक दिसते. डेनिम जॅकेट तुम्ही एखाद्या जीन्सवर देखील घालू शकता. यामुळे देखील तुम्हाला एक चांगला लूक मिळेल.