त्वचेच्या काळजीचा विचार केला तर फळांपासून बनवलेले फेस पॅक खूप वापरले जातात, पण तुम्ही कधी फळांची साले चेहऱ्यावर लावली आहेत का? नसल्यास, आता त्वचेच्या काळजीमध्ये फळांच्या सालीचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. खरं तर, काही फळांच्या सालीमध्ये भरपूर पोषक असतात, जे चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला चांगले पोषण मिळते. त्याचबरोबर चेहऱ्यावर साले लावण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही ते चेहऱ्यावर व्यवस्थित लावले तर तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होऊ शकतात.
डाळिंबाची साल
डाळिंबाची साल चांगली मॉइश्चरायझर आणि फेस स्क्रब म्हणून काम करते. ते वृद्धत्व कमी करण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेली साल्यांचा वापर करण्यासाठी सर्वात आधी ती उन्हात वाळवा आणि बारीक करा. यानंतर गुलाबपाणी किंवा लिंबाचा रस मिसळा आणि या सालींच्या पावडरने फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याला लावा.
( हे ही वाचा: मधुमेह रुग्णांनी नाश्त्यात अंड्यासह ‘या’ गोष्टी खाल्ल्या पाहिजेत; Blood Sugar झपाट्याने होऊ शकते कमी)
संत्र्याची साल
व्हिटॅमिन सी समृद्ध संत्र्याची साल चेहरा उजळण्यासाठी आणि पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी आहे. ही साले चेहऱ्याला ओलावाही देतात. ही साले उन्हात सर्वात आधी वाळवून घ्या त्यानंतर त्याची चांगली पेस्ट करा. तयार झालेल्या पावडरमध्ये दही मिसळा आणि चेहऱ्याला लावा. तुम्हाला हवे असल्यास या पेस्टमध्ये चंदन पावडरही टाकता येते.
सफरचंदाची साल
सफरचंद हे त्वचेसाठी भरपूर फायदेशीर मानले जाते. त्याची साले चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी उपयोगाची ठरतात. या सालांचा वापर चेहऱ्यावर लावण्यासाठी सफरचंदाची साल काढा आणि ही साले चेहऱ्यावर ताजी चोळा. थोड्या वेळाने चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला तुमची त्वचा चमकलेली दिसेल.
( हे ही वाचा: हिवाळ्यात काही लोकांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या यामागची गंभीर कारणे)
केळीची सालं
केळीच्या सालीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह असते, जे चेहऱ्यावरील मुरुम आणि जळजळ दूर करून त्वचेला शांत करते. या सालींचा आतील भाग चेहऱ्यावर चोळा आणि अर्धा तास ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
पपईची साल
या सालींमध्ये अँटीएजिंग गुणधर्म आढळतात. त्यांना त्वचेवर लावण्यासाठी पपईची साले बारीक करा. त्यात मध आणि लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा आणि २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.