बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन वाढण्याच्या समस्येने सर्वजण त्रस्त असल्याचे दिसुन येते. जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारामध्ये जंकफूडचा समावेश, पुरेसा व्यायाम न करने, बैठी कामाचे स्वरूप यांमुळे वजन लगेच वाढते. मग वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. जिम, डायट असे सगळे पर्याय अवलंबले तरी काही जणांचे वजन कमी होत नाही. उलट आहारावर अति नियंत्रण केल्यामुळे काही जणांना अशक्तपणा, थकवा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नेहमी योग्य आणि पुरेपूर आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी काही सोपे पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे काही देशी पेय, जी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोणती आहेत ती पेय जाणून घेऊया.

आले, लिंबू आणि पाणी

आले उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते आल्यामुळे पचनक्रिया सुधारते, तसेच आल्याचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. ज्यामुळे वजन वाढत नाही. हे पेय बनवण्यासाठी सर्वात आधी एक इंच आले लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर एक ग्लास थंड पाण्यासह हे आले वाटून घ्या. हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून त्यात एक चमचा भाजलेले जिरे पावडर टाका आणि अर्धे लिंबू पिळा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्रित करा. त्यानंतर हे पेय तुम्ही पिऊ शकता.

आणखी वाचा – Migrain Pain ची समस्या सतावतेय? ‘या’ आयुर्वेदिक उपायांनी मिळेल नक्की फायदा

मिंट लेमन ग्रीन टी

ग्रीन टी मेटाबोलिजम सुधारण्यासाठी उत्तम मानले जाते. याशिवाय त्वचेसाठी देखील ग्रीन टी फायदेशीर असते. हे पेय बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी आणि ६ ते ७ पुदिन्याची पान टाका. हे पाणी उकळून घ्या नंतर गॅस बंद करा. त्यानंतर त्यात २ चमचे ग्रीन टी टाका. हे मिश्रण पाच मिनिटांसाठी असेच ठेवा. त्यानंतर हे पेय गाळून घ्या म्हणजे त्यातून पाने बाजूला निघतील. या पेयात थोडे लिंबू पिळून हे पिऊ शकता.

अननस आणि लिंबाचे पेय

अननसाच्या एका तुकड्यात ४२ कॅलरीज असतात, ज्यापैकी ४ टक्के कर्बोदके असतात. अननसामध्ये मुबलक प्रमाणात मँगनीज आढळते. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. हे पेय बनवण्यासाठी अननसाचे लहान तुकडे करा आणि ते वाटून घ्या. हा रस एका क्लासमध्ये काढून त्यात एक लिंबू पिळा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा दालचिनी आणि चवीनुसार काळे मीठ घाला. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून हे पेय पिऊ शकता.

Weight loss : जेवणाची वेळ वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या

ब्लॅक कॉफी आणि डार्क चॉकलेट

ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनीक ऍसिड असते. जे एक अँटिऑक्सिडंट आहे ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होते. हे पेय बनवण्यासाठी एका कपमध्ये एक चमचे ब्लॅक कॉफी आणि कोमट पाणी घाला. त्यात अर्धा चमचा बारीक वाटलेले जवस टाका. हे सर्व नीट मिक्स करून त्यात १ चमचा बारीक किसलेले डार्क चॉकलेट टाका.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)