बद्धकोष्ठतेचा (constipation) जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोक विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात पण तरीही यातून काहीच उपायोग होत नाही. बदलती जीवनपध्दती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बध्दकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बरेच लोक या गंभीर समस्येला हलक्यात घेतात. वेळेवर उपचार केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यामुळे मूळव्याध आणि गंभीर प्रकरणांमध्ये गुदद्वाराच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. बद्धकोष्ठता तेव्हा उद्भवते जेव्हा पोट साफ होत नाही, शौचास होत नाही किंवा शौच बाहेर पडणे कठीण होते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, दिनचर्येतील बदल किंवा फायबरचे कमी सेवन यामुळे अनेकदा बद्धकोष्ठता निर्माण होते असे तज्ज्ञांचे मत आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक घरगुती टिप्स आहेत. जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय…

  • लिंबू आणि एरंडेल तेल

बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यातून लिंबू आणि एरंडेल तेल हे एकत्र करुन घ्यावे. सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते प्यावे. त्यामुळे ही समस्या हळूहळू दूर होत जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एरंडेल तेल मिसळून प्यावे. त्यामुळे सकाळी पोट सहज साफ होते.

  • दूध आणि मध

रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून घ्यावे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते. आणि आपले पोटही निरोगी राहते.

आणखी वाचा : Asthma: दम्याच्या त्रास होत आहे? फक्त ‘या’ तीन गोष्टी दुधात मिसळून प्या, होईल फायदा

  • लिंबाचा रस आणि काळे मीठ

गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते प्यावे. त्यामुळे पोटाची समस्या दूर होते.

  • त्रिफळा

त्रिफळा पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर थंड पाणी करुन ते प्राशन करणे. हा पोटासाठी रामबाण उपाय आहे.

  • पपई

पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटॅमिन डी आहे. म्हणून, दररोज शिजवलेले पपई खा.

  • अंजीर

अंजीर पाण्यात टाकू ठेवा. त्यानंतर ते खा. तसेच अंजीर दुधासोबतही खाऊ शकता. काही दिवस याचा वापर करा. तुमची बद्‍धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try these home remedies for constipation problem pdb
Show comments