Hair Care: लांब केस मिळवण्यासाठी लोका नेहमी प्रयत्न करत असताता, पण कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मोठ्या समस्यांचे समाधान दडलेले असते. तुम्ही लांब केसांसाठी महागडे शॅम्पू, कंडिशर, तेल वापरता. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या स्वंयपाकघरात अशाच काही गोष्टी आहेत जे केस वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. येथे आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला केस वाढण्यास मदत होईल. या उपायांमुळे केसांना मुळापासून टोकापर्यंत पोषण मिळते आणि केसांना चमक येते. जाणून घ्या केसांच्या वाढीसाठी काही प्रभावी घरगुती उपाय.
केसांच्या वाढीसाठी प्रभावी घरगुती उपाय | Effective Home Remedies For Hair Growth
अंडे
प्रथिनेयुक्त अंडे केसांना आवश्यकतेनुसार पोषण देते आणि त्यांना जाड आणि सुंदर ठेवते. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून एकदा अंड्याचा हेअर मास्क लावता येतो. अंड्याचा मास्क बनवण्यासाठी अंडे फोडून त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध मिसळा. हा हेअर मास्क केसांच्या मुळापासून शेवटपर्यंत लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवा. हा हेअर मास्क केसांना जीवनसत्त्वे आणि झिंक, लोह आणि सेलेनियम देखील देतो.
हेही वाचा – पहिल्यांदा बिकिनी व्हॅक्स करण्याचा विचार करत आहात? मग तुम्हाला ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहित असल्याच पाहिजेत
मेथी
पिवळ्या मेथीचे दाणेही केसांवर लावता येतात. केसांना मेथी लावण्यासाठी २ चमचे मेथी एका भांड्यात पाण्यात भिजवा. रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे दाणे बारीक करून घ्या. यानंतर, ही पेस्ट केसांवर २० मिनिटे ठेवल्यानंतर, केस धुवा. केस गळणे थांबेल आणि नवीन केस वाढण्यास मदत होईल.
हेही वाचा – रुसलेल्या जोडीदाराला कसे मनवावे? जाणून घ्या सोपी ट्रिक्स, चुटकीसरशी राग होईल शांत; नात्यामध्ये वाढेल प्रेम
कांदा
लांब केसांसाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. केसांवर कांद्याचा रस लावणे देखील सोपे आहे. एक कांदा घेऊन किसून घ्या. ते पिळून घ्या आणि कापूस किंवा बोटांच्या मदतीने टाळूवर लावा. हा रस १० ते १५ मिनिटे लावल्यानंतर आपले डोके स्वच्छ धुवा.