जर तुम्हाला काही तरी गोड खायची इच्छा आहे. पण ते गोड शरीराला फायद्याच ठराव असही वाटत असेलं तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. न्यूट्रिशनिस्ट पूजा माखीजा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून नुकतीच एका मग केकची रेसिपी शेअर केली आहे. हा केक खायला जेवढा चवदार आहे तेवढीच सोप्पी याची रेसिपी आहे. या रेसिपीची खासियत म्हणजे यात नेहमी वापरले जाणारे पीठ किंवा दुग्धजन्य पदार्थ नाहीत. तसेच या रेसिपीमध्ये चक्क गोड बटाटा अर्थात रताळे वापरले आहे. जर तुम्ही कोणाला या केकमध्ये काय साहित्य वापरले आहे हे सांगितले नाही तर कोणीच यात नक्की कोणते साहित्य वापरले आहेत हे सांगू शकत नाही असं पूजा माखीजा सांगतात.
साहित्य
२ टेबल स्पून – कोको पावडर
२ टेबल स्पून – बदाम पीठ
१/४ टीस्पून – बेकिंग पावडर
१/४ टीस्पून – मीठ
१ टीस्पून – बदामाचे बटर
२ टीस्पून – मॅपल सिरप
१- मध्यम आकाराचा उकडलेले रताळे
२ टेबल स्पून – नारळाचे दही
चॉकलेट चीप – आवडीनुसार
View this post on Instagram
कृती
१. एक मोठ्या आकाराचा कॉफी मग घ्या. त्यात कोको पावडर, बदाम पीठ, बेकिंग पावडर, मीठ, बदाम बटर आणि मॅपल सिरप घाला.
२. त्या मिश्रणात एक मध्यम आकाराचा उकडलेले रताळे घाला आणि व्यवस्थित मॅश करा.
३. पुढे मिश्रणात नारळाचे दही घालून मिक्स करा.
४. मिश्रणात वरून चॉकलेट चीप घाला.
५. ३ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करा आणि मस्त गरम गरम ते सर्व्ह करण्यास तयार आहे मग केक.