आपला दिवस सुरु झाल्या झाल्या आपण जो पहिला पदार्थ खातो तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य, आरोग्यदायी अशा रेसिपीच्या शोधात आपण नेहमीच असतो. नाश्त्याला हमखास ब्रेड खाल्ला जातो. किंवा ब्रेडपासून बनलेले पदार्थ खाल्ले जातात. ब्रेडवरती अनेक प्रयोग करून जगभर खूप रेसिपी तयार करण्यात आल्या आहेत. आजच्या इंटरनेटच्या काळात एका देशातील रेसिपी दुसऱ्या देशातील लोकांनाही सहज उपलब्ध होत आहेत. अशीच एक दुसऱ्या देशातील प्रसिद्ध रेसिपी म्हणजे फ्रेंच टोस्टची रेसिपी. या रेसिपीमध्ये पौष्टिक साहित्य घालून तुम्ही या रेसिपीला हेल्दी रेसिपीमध्ये बदलू शकता. अशीच एक प्रोटीन फ्रेंच टोस्टची हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

साहित्य:

३ ते ४ ब्रेडच्या स्लाईस
१ अंड
१/२ कप बदाम दूध
२ टेबल स्पून व्हॅनिला प्रोटीन
१/२ टीस्पून दालचिनी

कृती:

अंड, दूध, प्रोटीन पावडर आणि दालचिनी एकत्र मिसळा. मिसळण्यासाठी व्हीस्कचा वापर करा. हँड मिक्सरचादेखील वापर करू शकता. तर मिक्सरमध्ये मिक्स करणे जास्त सोप्पे जाते. मिक्स करून तयार झालेल्या मिश्रणात ब्रेडच्या स्लाईस बुडवा. गरम तव्यावर तेल किंवा बटर घाला. गरम झाल्यावर मध्यम आचेवर गॅस करून त्यावर मिश्रणात बुडवलेले ब्रेडचे स्लाईस ठेवा. काही मिनिटे दोन्ही बाजूनी चांगल शेकून घ्या. दह्यासोबत सर्व्ह करा. सोबतीला एखाद फळसुद्धा खा.