Coconut shell: भारतातील अनेक पदार्थांमध्ये नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दक्षिण भारतीय अन्न पदार्थ असो किंवा कोकणी पदार्थ असो, नारळाशिवाय हे पदार्थ पूर्ण होत नाही. नारळाच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. अशा परिस्थितीत आरोग्यतज्ज्ञदेखील नारळाला आहाराचा एक भाग बनवण्याचा सल्ला देतात.

परंतु, अनेकांना नारळ सोलायला खूप वैताग येतो. कारण यामध्ये खूप वेळ वाया जातो. इतकंच नाही तर कधी कधी नारळाच्या वाटीतून नारळ काढायला एक तास लागतो. अशा परिस्थितीत लोक वैतागून नारळ खाणंच टाळतात. तुम्हीदेखील या समस्येला सामोरे जात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त पाच मिनिटांत नारळाचे टरफल वेगळे करू शकाल. हा सोप्पा उपाय मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

फक्त पाच मिनिटांत नारळाला कवचातून काढा बाहेर

स्टेप १ – सर्वप्रथम नारळ फोडून त्याचे दोन तुकडे करा.

स्टेप २ – यानंतर कवचाच्या बाजूने तुटलेला नारळ गॅसच्या आचेवर ठेवा आणि कवच काळे होईपर्यंत असेच राहू द्या.

स्टेप ३ – सुमारे दोन-तीन मिनिटांनंतर नारळाचा कवच काळा होईल, नंतर त्याला पकडीच्या मदतीने धरून ठेवा आणि थेट थंड पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा.

स्टेप ४ – आता नारळ कवचाच्या आत आकुंचित होऊ लागतो, कवच किंचित थंड झाल्यावर चाकू घ्या आणि कवचाच्या आत हलवा. असे केल्याने नारळ टरफलेतून बाहेर पडेल.

हेही वाचा: Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील

पंकज भदौरिया यांच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही जास्त मेहनत न घेता पाच मिनिटांच्या आत खोबरे काढून टाकू शकता. मात्र, या काळात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जेव्हा नारळ गरम असेल तेव्हा तो काळजीपूर्वक उघडा आणि कवचाच्या आत चाकू खूपसून काळजीपूर्वक हलवा.

Story img Loader