घाईगडबडीत आपण आपल्या वस्तू विसरतो. कधी ऑफीसमध्ये गेल्यावर तर कधी एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पोहोचतो आणि बॅगेतला कंगवा घरी किंवा दुसऱ्या बॅगमध्ये राहील्याचे आपल्याला आठवते. पण केस खराब झाल्याने ते विंचरण्याशिवाय पर्यायही नसतो. एखादवेळी असे झाले तर ठिक आहे. पण वारंवार असे होत असेल आणि तुम्ही दुसऱ्याचा कंगवा वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच धोक्याचे ठरु शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसऱ्याचा कंगवा वापरला तर इतके काय असे आपल्याला वाटत असेल. पण दिर्घकाळासाठी ही सवय हानिकारक असते. आता अशाप्रकारे दुसऱ्याचा कंगवा वापरण्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. कंगवा ही दैनंदिन वापरातील अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच विविध आकाराचे आणि प्रकारचे कंगवे वापरत असतात. मग आपण वापरत असलेली वस्तू स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे कंगवा स्वच्छ करण्यासाठी त्याची योग्य पद्धत समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

१. इतरांचा कंगवा वापरल्याने त्यांच्या केसातील उवा किंवा कोंडा इतर घाण कंगव्यामार्फत आपल्या डोक्यात जाते. याशिवाय जंतूंचाही यामुळे प्रसार होतो आणि त्वचाविकारदेखील वाढतात.

२. केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा वाढणे, केस कमजोर होणे अशा समस्या उद्भवतात.

३. आता दुसऱ्याचा कंगवा वापरायची वेळ आलीच तर तो सॅनिटाईज करुन वापरा म्हणजे त्वचाविकार होण्यापासून तुमचे रक्षण होऊ शकते.

४. कंगवा स्वच्छ करण्याआधी त्यात गुंतलेले केस काढून टाका.

५. निर्जंतूक होईल अशा साबणामध्ये कंगवा बुडवून ठेवा. नियमित आठवड्यातून एकदा तासभर फणी पाण्यात भिजवा. पाण्यामुळे फणीला चिकटलेला मळ मोकळा होतो.

६. अशाप्रकारे कंगवा धुताना एकावेळी एकच कंगवा धुवा. एकाच भांड्यात दोन कंगवे धुवू नका.