कमी होत असलेले करोनाचे रुग्ण, वाढलेलं लसीकरण यामुळे सरकारने अनेक महिने बंद असलेली प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडी केली आहेत. अशातच दरवर्षी लाखो भाविक तिरुमाला मंदिरात आवश्य भेट देतात. मंदिराला भेट देण्यासाठी देशातून अनेक ठिकाणाहून भाविक येतात आणि यासाठी आधीच बुकिंगही करावे लागते. आंध्र प्रदेशातील तिरुमाला वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) स्वतंत्र ट्रस्टने म्हटले आहे की, ती आज, २२ ऑक्टोबरपासून विशेष दर्शनासाठी तिकिटांची विक्री सुरू केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुकिंग सुरु

टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, ‘विशेष प्रवेश दर्शना’ची तिकिटे सकाळी ९ वाजल्यापासून यात्रेकरू बुकिंगसाठी उपलब्ध असतील. तिकिटांची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे.

( हे ही वाचा: वन अविघ्नसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी इमारतीतील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत असावी, पण म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर! )

तिकीट असे करा बुक

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकृत वेबसाइटला येथे भेट द्या.

टीटीडीची नोटिस पेजवर लोड होईल.

तिथल्या बुकिंगच्या लिंकवर क्लिक करा: “कृपया विशेष प्रवेश दर्शन (रु. ३००) तिकिटे बुक करण्यासाठी येथे क्लिक करा”.

ही लिंक तुम्हाला त्या पानावर फॉरवर्ड करेल जिथे तुम्ही तपशील भरू शकता आणि प्रक्रिया पूर्ण करू शकता.

( हे ही वाचा: SSC GD Constable Exam 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा अर्ज फॉर्म स्टेटस जारी )

काय करावे आणि काय करू नये?

कोविड -१९ खबरदारीचा एक भाग म्हणून, टीटीडीने यात्रेकरूंना दर्शनाचा लाभ घेताना खालील गोष्टी तयार करण्याची विनंती केली आहे:

१. दोन्ही डोसचे लसीकरण प्रमाणपत्र, किंवा

२.दर्शनाच्या तारखेपूर्वी ७२ तासांच्या आत कोविड -१९ चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र असावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ttd online booking how to book tirumala tirupati devasthanams free darshan know process ttg