भारतात तुळस हे पवित्र रोप मानले जाते यामागे फक्त भारतीयांच्या श्रद्धा नाही तर तूळशीमधील उपचारात्मक गुणधर्म देखील कारणीभूत आहेत. सुगंधी वनस्पती तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि खोकला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध आरोग्य समस्यांसाठी पारंपारिकपणे घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की,’तुळस, ज्यालाholy basil (Ocimum tenuiflorum),म्हणून देखील ओळखले जाते, ते चयापचय वाढवणे, पचन सुधारणे आणि पोटाची चरबीचे उर्जेत रुपांतर करणे यासारख्या अनेक यंत्रणांद्वारे(mechanisms) वजन कमी करण्यास मदत करू शकते.’ २०१६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ‘ज्या सहभागींनी ८ आठवडे दिवसातून दोनदा पवित्र तुळशीचे कॅप्सूल घेतले त्यांच्या शरीराचे वजन आणि बॉडी मास इंडेक्समध्ये (BMI)सुधारणा दिसून आली.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा