मसालेदार पदार्थांमध्ये वापरल्या जाणा-या हळदीमध्ये औषधी गुण असल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे, या हळदीमध्ये असणारा ‘करक्यूमिन’ हा पदार्थ वेळेपूर्वी (अकाली) जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसाला होणा-या संभाव्य प्राणघातक नुकसानीपासून त्यांचे रक्षण करु शकत असल्याचे भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या परिक्षणात सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांना त्यांची फुप्फुसे व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे अनेकदा व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता असते. परंतु, या उपचारांमुळे बाळाच्या फुप्फुसाला नुकसान पोहचू शकते आणि त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
हार्बर-यूसीएलए मेडिकल सेंटरमधील ‘लॉस एंजिलिस बायोमेडिकल रिसर्च इंन्स्टिट्यूट’च्या संशोधककर्त्यांनी या आजाराच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर त्यांना करक्यूमिनमुळे अशा प्रकारच्या नुकसानीपासून दीर्घ काळासाठी बचाव होत असल्याचे आढळले. अमेरिकन जर्नल ऑफ फिडिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, करक्यूमिनमुळे ब्रांकोपलमोनरी डिस्प्लेसियापासून (बीडीपी) रक्षण होऊ शकते. बीडीपीमुळे जन्मलेल्या बाळाच्या शरिरात २१ दिवसांपर्यत फुप्फुसांच्या माध्यातून खूप ऑक्सिजन प्रवेश करतो.
संशोधनप्रमुख वीरेन्दर.के.रेहान म्हणाले की, वेळेपूर्वी जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या संरक्षणामध्ये करक्यूमिनमुळे होणा-या दीर्घकालीन लाभाचा फायदा दर्शविणारे हे पहिलेच परिक्षण आहे. करक्यूमिन हा अँन्टिऑक्सीडेन्ट, विरोधी सूक्ष्मजीव गुणधर्मी, ज्वलनविरोधी असून ज्या बाळांना ऑक्सीजन थेरपीची गरज आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला उपचार आहे.
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
मसालेदार पदार्थांमध्ये वापरल्या जाणा-या हळदीमध्ये औषधी गुण असल्याचे सांगितले जाते.
First published on: 05-08-2013 at 09:31 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric substance may protect premature infants lungs