जगभरात पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग सर्विस ट्विटर ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज(गुरुवार) सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत असल्याचे युजर्सना जाणवत आहे.
कोट्वधी युजर्सना लॉगिन करताना अडचणी जाणवत आहेत. आयडी लॉगिन केल्यानंतरही ट्विटर नेहमीप्रमाणे सुरू होत नसल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत आहेत.
भारतातही लाखो ट्विटर वापरकर्त्यांना आज सकाळी लॉगइन करताना अडचण येत आहे. वापरकर्त्यांनी सांगितले की, लॉगइन असलेले अकाउंट आपोआप बंद झाले, त्यानंतर जेव्हा पुन्हा लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकूनही ते लॉगिन होत नाही.
ट्विटर अॅप्लिकेशनवरही सुरू होत नाही आणि कॉम्प्युटरवरही सुरू होत नाही. आज सकाळी ७ वाजेपासून लाखो युजर्सना ही अडचण येत आहे. आयडी लॉगइन केल्यानंतर ‘Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again.” असा मेसेज येत आहे आणि रिफ्रेश करण्यास सांगतिलं जात आहे. त्यानंतरही अकाउंट सुरू होत नाही.