रोज दोन कप चहा महिलांच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायी असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. चहामुळे गर्भधारणा होण्यासाठी मदत होत असल्याचा दावा वैद्यकीय संशोधकांनी सर्वेक्षणाअंती केला. रोज नित्य दोन कप चहा पिणार्या महिलांमधील गर्भधारणेची शक्यता २७ टक्क्यांनी बळावते, असे बोस्टर विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. मात्र, असे असतानाही उष्णपेय समजल्या जाणा-या कॉफीचा गर्भधारणेच्या प्रक्रियेवर कुठलाच परिणाम होत नाही, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
तसेच, दिवसातून दोनदा सॉफ्ट ड्रिंक्स घेणार्या महिलांमधील गर्भधारणेची शक्यता २० टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. या परिक्षणासाठी संशोधकांनी एक वर्षापासून बाळासाठी प्रयत्नशील असलेल्या ३६०० महिलांची निवड करण्यात आली होती. चहामुळे गर्भधारणा होण्यासाठी मदत होत असली तरी गर्भधारणेसाठी महिलांनी चहाचे अतीसेवन करु नये, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा