पिंपल्स, मुरुमांचा त्रास जगभरातील प्रत्येक व्यक्तीला झालेला आहे किंवा होत असतो. अशातच या प्रकारच्या त्वचेच्या समस्यांबद्दल लोकांच्या मनात बरेच प्रश्न आणि चुकीची माहिती असते. व्यक्ती तरुण असो वा वयाने मोठा; मुरुमं, पिंपल्सबद्दलच्या माहितीसोबतच बऱ्याच गैरसमजुतीदेखील असतात.
काय आहेत हे समज, गैरसमज ते पाहू. सोबत त्यावर काय उपाय आहेत हे देखील पाहू.

तुमच्यादेखील आहेत का या गैरसमजुती?

१. अस्वच्छतेमुळे मुरुमं येतात :

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
metal spoon in honey
धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकते? तज्ज्ञ काय सांगतात…
Pune growing urbanization, PMPL, Pune metro,
सावध ऐका पुढल्या हाका…

स्वतःची निगा राखणं जरी महत्वाचं असलं, तरीही तुमच्या आनुवंशिकतेमुळे, बदलणाऱ्या हार्मोन्समुळे आणि त्वचेवर असणाऱ्या जंतूंमुळे मुरुमं, पिंपल्ससारखी समस्या उद्भवते.

२. पिंपल्स फोडल्याने मुरुमं जाण्यास मदत होते.

ही समजूत चुकीची आहे. याउलट पिंपल्स फोडल्यामुळे पिंपल्सची समस्याच अधिक वाढते. त्यासोबतच पिंपल्स फोडल्यामुळे त्यांचे चेहऱ्यावर डाग राहणे, इंफ्लेमेशनसोबत जंतू संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते.

३. मुरुमांची समस्या केवळ तारुण्यावस्थेत होते.

चूक. तारुण्यावस्थेत होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे अशा अवस्थेत असणाऱ्या मुलांमध्ये मुरुमांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. असं असलं तरीही मुरुमं येणासाठी वयाचं बंधन असून ते कोणत्याही वयातील व्यक्तींना येऊ शकतात.

४. तेलकट पदार्थ आणि चॉकलेटमुळे मुरुमं येतात?

काही ठराविक पदार्थांमुळे मुरुमं येतात, असं सांगणारा कोणताही विशिष्ट शास्त्रोक्त पुरावा नाहीये. तरी चांगल्या आहारामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊन त्वचेला आवश्यक असणारे पोषक घटक मिळल्याने, त्वचादेखील चांगली राहण्यास मदत होते. परंतु, व्यक्तीनुसार या सर्व गोष्टींमध्ये थोडाफार फरक पडतो. त्यामुळे आपण काय खातो यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.

५. पिंपल्स संसर्गजन्य असतात?

पिंपल्स किंवा मुरुमं संसर्गजन्य असतात हा समज चुकीचा आहे. मुरुमं स्पर्शाने, लाळेवाटे किंवा कोणत्याही प्रकारे पसरत नाहीत. मुरुमं येण्यासाठी हार्मोन्स, आनुवंशिकता आणि त्वचेवर असणारे तेल या गोष्टी कारणीभूत असतात.

आता पिंपल्स, मुरुमांबद्दल तुमचे गैरसमज दूर झाले असतील तर प्रयाग हॉस्पिटल ग्रुपच्या त्वचाशास्त्रज्ञ आणि वेनेरिओलॉजिस्ट [dermatologist and venereologist] डॉक्टर अदिती यांनी या समस्येवर काय उपाय करू शकतो, याबद्दल काही टिप्स दिल्या आहेत त्या बघू.

१. पिंपल्स, मुरुमांसाठी वापरली जाणारी क्रीम्स, जेल यांसारख्या वस्तूंमध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा साफ होण्यास मदत होऊन इंफ्लेमेशन कमी होण्यास मदत होते.

२. डॉक्टरांनी सुचवलेली औषधे

बाजारात मिळणाऱ्या क्रीम आणि जेलदेखील चेहऱ्यावरील मुरुमं कमी करण्यास मदत करत नसल्यास, त्वचाशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊ शकता. त्यांनी लिहून दिलेल्या औषधांनी ही समस्या कमी होण्यास मदत होईल.

३. लेझर आणि लाईट ट्रीटमेंट

या ट्रीटमेंट जंतूंना दूर ठेवण्यास मदत करून, इंफ्लेमेशन कमी करण्यास मदत होते.

४. जीवनशैलीत बदल करणे

चांगला सकस आहार घेणे, ताण कमी करणे आणि त्वचेची व्यवस्थित काळजी घेण्याने तुमच्या त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

यांसारखे उपाय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांसाठी करून त्यांची काळजी घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेनुसार कोणते उपाय उपयोगी पडू शकतात हे ठरते. त्यामुळे मुरुमांसारख्या समस्यांसाठी त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.