Union Budget 2025 Makhana Benefits: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी गरीब, शेतकरी आणि महिलांवर सरकारचा भर असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ग्रामीण भागातील रोजगारासह भाजीपाला आणि फळांसाठी मोठी योजना प्रस्तावित आहे अशी घोषणा केली. याचवेळी त्यांनी देशातील मखाणा उत्पादनाला चालना देण्याबाबतही भाष्य केलं. यासाठी देशात मखाणा बोर्ड स्थापन (Union Budget 2025 Bihar Makhana Board) करण्यात येईल अशी घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “बिहारमध्ये मखाणा बोर्ड प्रस्तावित आहे. मखाणा मार्केटिंगसाठी बोर्डाची स्थापना केली जाईल. मखाणा शेतकऱ्यांच्या हितासाठी हे केले जाणार आहे. त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील”. पण या मखाणाच्या सेवनाचे शरीरास नेमके कोणते फायदे मिळतात जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मखाणाचे उत्पादन वाढल्याने कृषी क्षेत्रालाच अधिक फायदा होणार नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते फायदेशीर आहे. मखाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे. शिवाय हाडांसाठीही फायदेशीर आहे. याचे अनेक फायदे पुरुषांच्या आरोग्यावरही दिसून येतात.प्रथिने, आहारातील फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असे अनेक घटक त्यात आढळतात. मखाणामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. म्हणून, आपण सहजपणे आपल्या आहाराचा भाग बनवू शकता. याशिवाय मखणामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे भूक कमी होते. शिवाय हाडांसाठीही फायदेशीर आहे. याचे अनेक फायदे पुरुषांच्या आरोग्यावरही दिसून येतात.

मखाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे तो आहारातील एक अतिशय उत्तम पदार्थ मानला जाते. यामुळे अनेक आहार तज्ज्ञ देखील मखाणा खाण्याचा सल्ला देतात. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रोत्साहन मिळते. साधारणपणे बहुतेकजण मखाणा तुपात, तेलात किंवा बटरमध्ये तळून मीठ घालून खातात. पण मखाणापासून इतरही अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.

मखाणा खाण्याचे फायदे

वजन होते कमी

जर तुम्ही वाढत्या वजनामुळे खूप दिवसांपासून त्रस्त असाल तर मखाणा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. भूक लागल्यावर मखणा खाल्ल्याने पोट भरलेल्यासारखे वाटते आणि पचनासही मदत होते. पोषणाबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.

मखाणामध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि स्नायू मजबूत करण्यासाठी पोषक असतात. रोज मूठभर मखाणा खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात. तुम्ही वर्कआउटच्या आधी किंवा नंतर कधीही मखाणा खाऊ शकता.

शुक्राणूंची संख्या वाढते

मखाणामध्ये झिंकचे प्रमाण अधिक असते. झिंकच्या कमतरतेचा पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. झिंकच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, रोज मखाणा खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी निरोगी राहते.

ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मखाणामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते जे हृदयासाठी फायदेशीर असते. हृदयाची काळजी घेण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही अशा पुरुषांपैकी एक असाल ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत आणि तुमच्या हृदयाची काळजी घ्यायची असेल, तर दररोज तुमच्या आहारात मूठभर मखाणाचा समावेश करा.

मखाणापासून बनवा ‘हे’ स्वादिष्ट, पौष्टिक पदार्थ

मखाणा चाट

उपवासात तुम्ही मखाणा चाटचा आनंद घेऊ शकता. यासाठी आधी बटाटे उकळावा. यानंतर एका वेगळ्या पॅनमध्ये मखणा तळून कुरकुरीत करा. आता उकडलेल्या बटाट्यात भाजलेले शेंगदाणे टाका. यानंतर धणे, मिरची, चाट मसाला आणि लिंबू मिक्स करा, यानंतर शेवटी भाजून कुरकुरीत करुन घेतलेला मखाणा घालून नीट मिक्स करा, अशाप्रकारे तयार झाला तुमचा मसालेदार मखना चाट.

मखाणा रायता

मखाणा नीट तळून घ्या. यानंतर दह्यात भाजलेले जिरे आणि काळे मीठ घाला. हिरवी मिरची आणि कोथिंबीर भुरभुरा आणि चांगले मिसळा. त्यात थोडी पिठीसाखर घाला. शेवटी भाजलेला कुरकुरीत मखाणा घालून नीट मिक्स करा. यानंतर कढीपत्ता, मोहरी आणि लाल मिरचीची चांगली फोडणी द्या.

मखाणा करी

मखाणा तळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र आणि लाल मिरची मसाला घाला. बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या, नंतर लसूण मिरची पेस्ट घाला. यानंतर टोमॅटोची पेस्ट आणि धनेपूड, गरम मसाला पावडर आणि भाजीचा मसाला असे सर्व कोरडे मसाले घाला. बाजूंने तेल जमा होईपर्यंत मसाला चांगला परतून घ्या. नंतर पनीर आणि मखना घालून मिक्स करा. मीठ घालून थोडे पाणी घाला. चविष्ट मखाणा करी तयार आहे. आता यावर कोथिंबीरीने सजवा.