Unique Name for Boy: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘विरुष्का’ दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांनी मुलाला जन्म दिला. अलीकडेच विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा वडील झाल्याची माहिती दिली. एका पोस्टमध्ये सांगितले की, १५ फेब्रुवारीला आम्ही वामिकाच्या भावाचे या जगात स्वागत केले. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवले आहे. ही बातमी येताच सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. दुसऱ्या अपत्यासाठीही त्यांनी हटके नाव निवडले आहे. आता ‘अकाय’चा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा होत आहे. याचा अर्थ ‘ज्याचा कोणताही आकार नाही असा होतो.’
प्रत्येक पालकाला आपल्या बाळाचं नाव हटके असावं असं वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला आवडावं असा विचार बाळाचे आई-बाबा करत असतात. आजकालच्या ट्रेंडचे अनुसरण करून, पालक त्यांच्या मुलांसाठी भिन्न नावे शोधत असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की, नावाचा एखाद्याच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. यामुळेच लोक जन्मापूर्वीच आपल्या मुलाच्या नावाचा विचार करू लागतात. चला जाणून घेऊया अशाच काही नावांची यादी, जी ऐकायला खूप अनोखी आहे.
बाळाच्या अनोख्या नावांची यादी पाहा
गुणातीत
हे नाव स्वतःच खूप वेगळे आहे. हे नाव तुम्ही यापूर्वी क्वचितच ऐकले असेल. गुणातीत म्हणजे ‘जो गुणांच्या प्रभावापासून वेगळा आहे.’ हे नाव भगवान गणेशाच्या नावाचे समानार्थी आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाला सर्वात अनोखे नाव द्यायचे असेल, तर गुणातीत हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
नभास
तुम्ही हे नाव आधी ऐकले असेल. नभास हा शब्द आकाशाशी संबंधित आहे. नभात नभ म्हणजे आकाश. अशा परिस्थितीत या नावाचा तुमच्या मुलावर प्रभाव पडेल आणि त्याला हाक मारायलाही हे चांगले वाटू शकते.
दिवित
दिवित म्हणजे अमर. अमर हे नाव तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल, पण दिवित हे नाव क्वचितच कोणी ऐकले असेल आणि त्याला या नावाने हाक मारायलाही बरे वाटू शकते.
नित्विक
आजच्या आधुनिक जीवनशैलीत लोक अशी नावे शोधतात. नित्विक हे आजच्या ट्रेंडप्रमाणेच सर्वात अनोखे नाव आहे. याचा अर्थ खूप प्रेम असा होतो. तुम्ही तुमच्या बाळाला हे नाव देऊ शकता.