सकाळी झाली की, आपण सगळे अंघोळीसाठी जातो. अंघोळ झाल्यानंतर आपण अंग पुसण्यासाठी टाॅवेलचा वापर करतो. परंतु अनेकांना सावरियाँ चित्रपटामधल्या रणबीर कपूरप्रमाणे टॉवेल गुंडाळून फिरण्याचा छंद असतो. सावरियाँ चित्रपटातल्या ‘जब से तेरे नैना’ या गाण्यात रणबीरने टॉवेल गुंडाळून डान्स केला होता. त्याचा हा डान्स फेमस झाला होता. त्यामुळे टॉवेल गुंडाळून फिरण्याचा ट्रेंड आणखी प्रसिद्ध झाला होता. पण, ओला टॉवेल शरीराला बराच वेळ गुंडाळून ठेवल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते हे तुम्हाला माहितेय का, माहिती वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंघोळीनंतर टॉवेल गुंडाळून फिरल्यास काय होणार?

अमेरिकेतल्या (USA) अॅरिझोना (University of Arizona) विद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनातून टॉयलेटमध्ये जसे जंतू आढळतात तसे जंतू अस्वच्छ आणि ओल्या टॉवेलवर असू शकतात, असं अनेक वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं. तसेच प्रत्येकाचा स्वतःचा एक स्वतंत्र टॉवेल असावा. दुसऱ्याचा टॉवेल वापरणं देखील धोकादायक असतं, असेही या संशोधनातून पुढे आले होते.

(हे ही वाचा: शिट्टी वाजल्यावर कुकरमधलं फसफसून पाणी बाहेर येतंय? करा ‘हे’ ५ सोपे घरगुती जुगाड, होणार नाही कधीच गळती! )

उपाय काय?

अस्वच्छ टॉवेल वापरल्याने फूड पॉयझनिंग आणि अतिसाराचा धोका वाढतो, असं या संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे अंघोळीनंतर टॉवेलचा वापर केल्यावर तो वाळवला पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे टॉवेलवरचे धोकादायक बॅक्टेरिया मरतात आणि तुम्हालाही धोका होत नाही.

अशा परिस्थितीमध्ये ओलसर टॉवेलचा वापर टाळणे महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University of arizona in marica has revealed many years ago that towels contain germs like those found in your toilet pdb
Show comments