Uric Acid Ayurvedic Treatment : डॉ. अमरेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होते. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेव्हा तुमच्या आहारात प्युरीन युक्त अन्नाचे प्रमाण वाढते त्याचा थेट परिणाम हा युरिक ऍसिडच्या वाढीवर दिसून येतो. पण युरिक ऍसिड वाढण्यामागे हे एकमेव कारण नाही. अधिक वजन, मधुमेह व अधिक मद्यपान केल्याने सुद्धा युरिक ऍसिड व संबंधित आजारांचा धोका बळावतो.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर वेळीच युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवले नाही तर यातून सांधे व हाडांचे अनेक विकार वाढू शकतात. युरिक ऍसिड सुरुवातीला किडनीवर आघात करते, याशिवाय हृदयाच्या संबंधित आजारही यामुळे डोके वर काढू शकतात. अनेक सर्वेक्षणात समोर आले आहे की युरिक ऍसिड वाढल्याने अशा व्यक्तींना टाईप २ मधुमेह व उच्च रक्तदाब असे त्रास उद्भवू शकतात. तसेच फॅटी लिव्हरच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांमध्येही युरिक ऍसिड अधिक असणे हा कॉमन घटक आढळून येतो.
युरिक ऍसिडमुळे शरीरात विशेषतः सांध्यांमध्ये खड्यांसारखे क्रिस्टल तयार होतात. यामुळे अवयवांना सूज येऊ शकते व यामुळे वेदनाही वाढू शकतात. अशा रुग्णांना मद्य व गोडाधोडाचे पदार्थांचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो तसेच दररोज निदान ८ ग्लास पिण्याचा सल्ला दिला जातो. आपण काही आयुर्वेदिक उपचारांनीही युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करू शकता. आयुर्वेदिक अभ्यासकांच्या माहितीनुसार मुलेठी म्हणजेच ज्येष्ठमधाच्या वापराचा युरिक ऍसिडच्या रुग्णांना मोठा लाभ होऊ शकतो.
ज्येष्ठमधाने युरिक ऍसिड कसे कमी होते?
ज्येष्ठमधाच्या सेवनाने रोगरप्रतिकारक क्षमता वाढते व पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तुम्हाला जर सतत छातीत जळजळ, पोटात अल्सर, किंवा आतड्यांना सूज येण्यासारखे त्रास जाणवत असतील तर ज्येष्ठमधाचे सेवन गुणकारी ठरते. ज्येष्ठमधात अनेक अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असतात ज्यामुळे सांधेदुखी, सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमध शरीरातील विषाणूंशी लढण्यास सक्षम असते.
Uric Acid: शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे; बोटांना सूज, थकव्यासह दिसून येतात ‘ही’ लक्षणे
ज्येष्ठमधात ग्लाइसिराइजिन हा घटक मुबलक प्रमाणात असतो ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. आपण ज्येष्ठमधाचे रस किंवा चूर्ण अशा रूपात सेवन करू शकते. जर आपणही चहाप्रेमी असाल तर रोजच्या चहात ज्येष्ठमधाची एक काडी टाकणेही फायदेशीर ठरू शकते.
(टीप: वरील लेख हा वैद्यकीय सल्ला नाही, आयुर्वेदिक उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)