युरिक ऍसिड हा रक्तामध्ये आढळणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात प्युरिन नावाची रसायनांचे विघटन होते तेव्हा युरिक ऍसिड तयार होते. बहुतेक यूरिक ऍसिड रक्तात विरघळते, लघवीतून शरीराबाहेर टाकले जाते. प्युरीन समृध्द अन्न आणि पेये देखील रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी वाढवतात. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्याने गाउट रोग होऊ शकतो. गाउट हा एक प्रकारचा संधिवात आहे. ज्यामध्ये सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यास हायपरयुरिसेमिया होऊ शकतो.
ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यूरिक ऍसिड ‘क्रिस्टल्स’ रुपात तयार होऊ शकतात. हे क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होऊन संधिवात होऊ शकतात. एवढेच नाही तर त्यामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो. जर यूरिक ऍसिडच्या उच्च पातळीवर उपचार न करता सोडले तर ते हाडे, सांधे यांचे नुकसान करू शकते. एवढेच नाही तर यामुळे किडनीचे आजार आणि हृदयविकारही होऊ शकतात. यासाठी अनेक उपाय आहेत, परंतु काही घरगुती उपायांनीही तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.
( हे ही वाचा: करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘Brain Fog’चा धोका; जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावासाठी उपाय)
कोथिंबीरीचे पान युरिक ऍसिड साठी ठरेल फायदेशीर
कोथिंबीरीची हिरवी पाने फक्त जेवणाची चवच वाढवत नाहीत तर अनेक गंभीर आजारांवर उपचार करतात. कोथिंबिरीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. रक्तातील क्रिएटिन आणि युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही कोथिंबीरच्या पानांचा वापर करू शकता. कोथंबीर फायबर, लोह, मॅंगनीज, मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. प्रथिनेव्यतिरिक्त, पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, थायामिन, फॉस्फरस, नियासिन यांसारखी खनिजे देखील असतात.
कोथंबिरीचा वापर कसा करावा
कोथिंबिरीची जुडी घ्या, पाने नीट धुवा. यानंतर अर्धा तास पाने मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. कोथिंबिरीच्या झाडाची मुळे कापल्यानंतर बंद भांड्यात दोन ग्लास पाण्यात १० मिनिटे उकळा. झाकण न काढता पाणी थंड होऊ द्या. रिकाम्या पोटी या कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करा.
( हे ही वाचा: Cinnamon Benefits: हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्यास ‘हे’ १० आजार होतील दूर; जाणून घ्या यादी)
तमालपत्राचा वापर
तमालपत्राचा वापर स्वयंपाकघरात मसाला म्हणून केला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते, उच्च यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी तमालपत्र प्रभावी मानले जाते. एका अभ्यासानुसार, हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर हा एक हर्बल उपाय देखील आहे जो यूरिक ऍसिड कमी करू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फॉलिक अॅसिड असते जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते.
तमालपत्र कसे वापरावे
यासाठी १० ते १५ तमालपत्र घ्या आणि तीन ग्लास पाणी देखील घ्या. तुम्ही तमालपत्र पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत वाहत्या पाण्याखाली धुवा. तमालपत्र स्वच्छ केल्यानंतर, त्यांना उकळत्या पाण्यात उकळवा. दिवसातून दोनदा उकळलेले पाणी प्या.
( हे ही वाचा: Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)
सुपारीची पाने खा
सुपारीची हिरवी पाने खाल्ल्याने युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, संशोधनादरम्यान सुपारीच्या पानांचा अर्क उंदरांना दिल्याने त्यांची यूरिक अॅसिड पातळी ८.०९ mg/dl वरून २.०२mg/dl झाली. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेची आहे की यासाठी तुम्ही सुपारीची पाने खाऊ शकता पण त्यासोबत तंबाखूचे सेवन करू नये.