केस घनदाट, मऊ व चमकदार होण्यासाठी आपण कितीतरी उपाय करून पाहत असतो. कधी अमुक तेल लावा, तर कधी तमुक हेअर मास्क लावा, असे सल्लेसुद्धा आपल्याला अनेकांकडून मिळत असतात. परंतु, घरात असणाऱ्या एका पदार्थामुळे तुमच्या केसांचे अतिशय चांगल्या प्रकारे पोषण होऊ शकते. तो पदार्थ म्हणजे नारळ. नारळाचे तेल आपल्यासाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहीत आहे. परंतु, नारळाच्या तेलाप्रमाणे त्याचे दूधसुद्धा तितकेच फायदेशीर ठरू शकते.

नारळाच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, प्रथिने व फॅटी ॲसिड्स असतात; ज्यामुळे ते तुमच्या केसांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पोषण करू शकते, अशी माहिती द टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून मिळाली आहे. या दुधामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे केसांची वाढ होणे, केसांच्या मुळातील मॉइश्चर टिकवून ठेवणे यांसारखे फायदे होऊ शकतात, अशीदेखील माहिती मिळते. नारळाच्या दुधाचा केसांसाठी नेमका वापर कसा करायचा ते पाहा.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

केसांसाठी नारळाचे दूध वापरण्याच्या सहा टिप्स पाहा

टिप्स पाहण्याआधी घरात नारळाचे दूध कसे काढायचे ते पाहा.

नारळ फोडून तो खरवडून घ्या. खरवडलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर वाटलेले मिश्रण एका कापडामध्ये घालून सर्व मिश्रण घट्ट पिळून घ्यावे. नारळाचे दूध तयार आहे.

हेही वाचा : हिवाळ्यात आंघोळ करताना ‘या’ पाच गोष्टींकडे लक्ष द्या; पाहा त्वचा मुलायम अन् तुकतुकीत ठेवण्यासाठी या टिप्स….

जर हे दूध बाहेरून विकत आणणार असाल, तर त्यामध्ये साखर नसेल हे बघून घ्या.

१. हेअर मास्क

साहित्य
नारळाचे दूध
मध
ऑलिव्ह तेल

कृती
आपल्या केसांना, केसांच्या मुळांना आणि टोकाला सगळीकडे हे मिश्रण लावून घ्यावे.
हे मिश्रण ३० ते ४५ मिनिटांसाठी तसेच ठेवावे.
नंतर कोमट पाणी व शाम्पूचा वापर करून केस धुवा.

२. नारळाचे दूध आणि कोरफड

साहित्य
नारळाचे दूध
कोरफडीचा गर

कृती
नारळाच्या दुधामध्ये कोरफडीचा गर/जेल घालून एक मिश्रण बनवावे.
हे मिश्रण केसांच्या मुळांना २०-३० मिनिटांसाठी लावून ठेवावे.
नंतर कोमट पाणी व शाम्पूच्या मदतीने केस धुवावे.

३. नारळाचे दूध आणि कढीपत्ता

साहित्य
नारळाचे दूध
मूठभर कढीपत्त्याची ताजी पाने

कृती
नारळाच्या दुधामध्ये काही मिनिटे कढीपत्त्याची पाने उकळून घ्या.
मिश्रण गार झाल्यानंतर केसांच्या मुळांशी लावावे.
३० मिनिटांनंतर कोमट पाणी व शाम्पूच्या मदतीने केस धुवावे.

४. नारळाचे दूध आणि मेथी

साहित्य
नारळाचे दूध
मेथी पावडर

कृती
नारळाच्या दुधामध्ये मेथीची पावडर मिसळून एक मिश्राण तयार करून घ्या.
हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना ३० मिनिटांसाठी लावून ठेवा.
नंतर कोमट पाण्याने सर्व मिश्रण व्यवस्थित धुऊन घ्या.

हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळे अन् चेहरा थकल्यासारखा दिसतोय? त्वचेची काळजी घेतील ‘हे’ पाच घरगुती फेस पॅक, पाहा

५. नारळाच्या दुधाचे लिव्ह इन कंडिशनर [leave in conditioner]

साहित्य
नारळाचे दूध
आर्गन तेल [argan oil]

कृती
नारळाचे दूध आणि आर्गन तेल मिक्सरमधून फिरवून दोन्ही पदार्थ एकजीव करून घ्या.
ओल्या, दमट केसांच्या खालच्या भागावर/टोकांवर याचा उपयोग करा.
नारळाच्या दुधाचे हे मिश्रण असेच केसांमध्ये राहू द्यावे. त्यामुळे केस छान होऊन, ते सांभाळणे सोपे होते.

६. नारळाचे दूध आणि लिंबू

साहित्य
नारळाचे दूध
एका लिंबाचा रस

कृती
नारळाच्या दुधामध्ये लिंबाचा रस व्यवस्थित मिसळून घ्यावा.
केस धुताना सर्वांत शेवटी म्हणजे शाम्पूने केस धुतल्यानंतर हे मिश्रण आपल्या केसांना लावावे.
काही मिनिटे तसेच ठेवून मग कोमट पाण्याने केस धुवावेत.

नारळाच्या दुधाचा केसांना अधिक उपयोग होण्यासाठी सहा टिप्स…

१. नियमितता हवी

केसांची वाढ होण्यासाठी नारळाच्या दुधाचा तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नियमित वापर करावा.

२. प्रमाण

तुमच्या केसांनुसार आणि त्यांना चालतील इतक्याच प्रमाणात या गोष्टींचा वापर करावा. एखादा घटक किंवा पदार्थ तुम्हाला चालत नसल्यास त्याचा वापर टाळावा.

हेही वाचा : कोरफडीसोबत ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी

३. नारळाचे कोमट दूध

केसांमध्ये सर्व घटक व्यवस्थित शोषले जावे यासाठी नारळाचे दूध हलके कोमट करून, त्याचा वापर करावा.

४. मसाज

नारळाचे दूध केसांना लावत असताना, केसांच्या मुळाशी मसाज करण्यास विसरू नका. मसाज केल्याने तेथील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

५. केसांना झाकून ठेवावे

केस धुतल्यानंतर ते वाऱ्यावर सोडण्याऐवजी त्यांना शॉवर कॅपमध्ये बांधून ठेवा. शॉवर कॅप नसल्यास टॉवेल कोमट करून, त्यामध्ये आपले केस गुंडाळून ठेवावेत.

६. केस व्यवस्थित धुणे

एखादा हेअर मास्क, नारळाचे दूध किंवा तेल लावले असल्यास ते पाण्याने धुतल्यानंतर नीट निघून गेले असल्याची खात्री करावी.

[टीप : वरील लेख हा मिळवलेल्या माहितीवर आधारित असून, त्यातील कोणत्याही घटकाने वा पदार्थाने तुम्हाला त्रास होत असल्यात त्याचा वापर करू नये.]

Story img Loader