कित्येक दशकांपूर्वी पांढरे केस फक्त त्यांच्या डोक्यावर येत ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे पण आजकाल पांढऱ्या केसांची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. आजच्या काळामध्ये तरुणांमध्येही पांढऱ्या केसांची समस्या दिसते. त्यामुळे तरुणांना त्यांच्या डोक्यावरही पांढरे केस झाले तर अशी भिती सतावत असते. जर तुम्ही तुमचा दैनंदिन आहार शिस्तबद्ध पद्धतीने खाल्ला तर तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, जरी काही लोकांना हा त्रास अनुवांशिक कारणांमुळे होतो, परंतु सामान्यतः खरे कारण म्हणजे अस्वास्थ्यकर आहाराच्या सवयी आहेत.
जस जसे आपले वय वाढत जाते तसे आपले केस देखील पांढरे होतात. तथापि, अनेकांना वेळेआधीच पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. कारण काहीही असो अनेकांना केस पांढरे होणे ही समस्या वाटते आणि त्यामुळे आपले केस कलेचं राहावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र केस काळे करत असताना जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा ज्यामुळे केसांना नुकसान होणार नाही. पांढरे केस दर २० ते २५ दिवसांनी काळे करावे लागतात. यावेळी नैसर्गिक पर्यायाऐवजी रासायनिक पर्यायांचा वापर केल्यास केस गळणे, कोरडे होणे, खराब होणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. केस काळे करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पर्याय म्हणून मेहेंदीचा वापर करता येऊ शकतो. यामुळे केस रंगवल्यावर लाला नाही तर काळे होण्यास मदत होते. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.
हेही वाचा : Health Tips: डोळ्यांना अस्पष्ट दिसत आहे? दृष्टी सुधारण्यासाठी करा ‘हे’ तीन सोपे उपाय
मेहेंदी पूर्णपणे नैसर्गिक आहे. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मेहेंदीचा वापर केला जाऊ शकतो.
मेहेंदी आणि मेथीचे दाणे
एका भांड्यात ३ चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या दाण्यांची पेस्ट तयार करावी. यानंतर ४ कापूर घेऊन ते बारीक करावेत. त्यानंतर ते सर्व मिश्रण ३ चमचे मेहेंदी पावडरमध्ये मिसळावे. त्यात पाणी घालून मेथीची पेस्ट मिसळावी. ते मिश्रण चांगले एकतरी केल्यानंतर ते केसांवर लावण्यासाठी तयार होते. हे मिश्रण साधारणपणे एक तासभर केसांवर लावावे व त्यानंतर ते पाण्याने धुवावे. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.
मेहेंदी आणि इंडिगो
इंडिगो पावडर बाजारात सहजपणे उपलब्ध असते. या पावडरचा वापर केल्याने तुम्हाला केसांवर गडद काळा रंग दिसू शकतो. हे मिश्रण तयार तयार करण्यासाठी मेहेंदी आणि इंडिगो सामान प्रमाणात घ्यावे. या मिश्रणामध्ये २ ते ३ चमचे कॉफी पावडर मिसळावी. त्यात पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर २ ते ३ तास ठेवल्यानंतर धुवावे. यामुळे केस काळे दिसायला लागतील.
मेहेंदी आणि आवळा
पांढरे केस काळे करण्यासाठी याप्रकारे देखील मेहेंदी लावता येते. काळा चहासह याला शिजवावे. त्यात मेहेंदी पावडर मिसळावी. लिंबाचा रस पिळावा. आवळा पावडर आई थोडीशी कॉफी पावडर मिसळावी. या मिश्रणामध्ये अंड्यातील पिवळ्या रंगाचे बलक देखील मिसळू शकता. याची पेस्ट तयार करावी आणि केसांना लावावी. किमान ३ ते ४ तास ते केसांना लावून ठेवावे. नंतर केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमचे केस काळे दिसू लागतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)