या दिवाळीला चमकदार त्वचेसाठी तुम्हाला सौदर्य प्रसाधने घेण्याची गरज नाही. घरीच दुधाच्या सायीचा वापर करून तुम्ही चेहऱ्याची सुंदरता वाढवू शकता. दुधाच्या साईने तुम्ही त्वचा सुंदर, तजेलदार बनवू शकता. सुंदर त्वचेसाठी दुधाच्या सायीचा वापर कसा करावा, याबाबत आज आपण जाणून घेऊया.

असा करा वापर

Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
  • सुंदर त्वचेसाठी दुधाची साय आणि मधाचा वापर करू शकता. एका वाटीत दुधाची साय आणि मध एकत्र करा. त्यानंतर हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावा. १० ते १५ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने तुमची त्वचा धुवा. असे केल्याने अ‍ॅक्ने, व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स आदी समस्यांपासून आराम मिळू शकते.
  • तुम्ही त्वचेवर हळद आणि दुधाची साय देखील लावू शकता. याने देखील त्वचा उजळू शकते. हळद आणि दुधाच्या सायीचे मिश्रण करा. हे मिश्रण त्वचेवर लावा आणि १० ते १५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा धुवून टाका. असे केल्याने त्वचेवरील डाग दूर होऊ शकतात, त्याचबरोबर त्वचा चमकदार होऊ शकते.
  • सुंदर त्वचेसाठी बेसन आणि दुधाच्या सायीचा देखील वापर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला अक्रोडचे पावडर देखील लागेल. या तिघांना एकत्र करून त्यांचे मिश्रण करा. हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावा आणि ते १० ते १५ मिनिटांपर्यंत लावून राहू द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा धुवून टाका. असे केल्याने चेहरा उजळेल.

त्वचा स्वच्छ करते

जर तुम्हाला त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ करायची असेल तर दुधाची साय वापरा. साय त्वचेच्या छिद्रांना खोलवर साफ करते, तसेच याचा नियमित वापर केल्याने त्वचेवर साचलेली घाण साफ होऊन त्वचा चमकदार दिसते.

स्क्रब म्हणून दुधाची साय वापरा

दुधाची साय तुम्ही स्क्रब म्हणूनही वापरू शकता. दुधाच्या सायीत ओटचे बारीक दाणे मिसळा आणि चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. ओटमील आणि साय हे तुमच्या चेहऱ्यासाठी एक उत्तम स्क्रब आहे, जे चेहऱ्यावरील घाण साफ करेल, तसेच त्वचेवर चमक आणेल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)