Kitchen Jugaad : तुम्ही तुमच्या घरकाम करता का? म्हणजे तुमच्या घरात झाडून मारणे, फरशी पुसणे, कपडे धुणे किंवा भांडी घासणे. तुम्ही जर ही कामे नियमित करत असाल तर तुम्हाला याची कल्पना असेल की यापैकी कोणतेही काम अजिबात सोपे नाही. घरकाम करताना प्रचंड मेहनत करावी लागते. आजच्या काळात नोकरी करून घरातील कामे करताना प्रचंड तारांबळ होते. अशा परिस्थितीमध्ये आपण झटपट कामे उरकण्याचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा कितीही प्रयत्न केला तरी तरी छोट्या छोट्या कामात खूप वेळ जातो. अशा वेळी कामी येतो आपला घरगुती जुगाड. अगदी छोटीशी ट्रिक वापरून तुम्ही तुमचे अवघड काम सोपे करू शकता आणि वेळही वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत जी तुमचा वेळही वाचवेल आणि तुमचे कामही सोपे करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही जर घरात नेहमी झाडून घेत असाल किंवा फरशी पूसत असाल तर तुम्हाला याची चांगली कल्पना असेल की हे किती अवघड काम आहे. घराच्या काना-कोपऱ्यात कचरा असतोच पण त्याचबरोबर केसही पसरलेले असतात. अशावेळी कितीही केस गोळा केले तरी कुठे ना कुठे केस मागे राहतात. फरशी पुसताना हे केस जास्त त्रासदायक ठरतात त्यामुळे विनाकारण वेळ वाया जातो. त्यामुळे आपण प्रयत्न करतो की झाडून काढतानाच व्यवस्थित सर्व केस साफ होतील. आपण घराच्या काना-कोपऱ्यातून झाडून घेतो. आपल्याला असे वाटते की, सर्व केस आता साफ झाले पण तुम्हाला माहितीये का ते केस कचऱ्यात जात नाही तर झाडूमध्ये अडकतात. पुढच्यावेळी झाडून घेताना तेच केस पुन्हा घरभर पसरतात किंवा झाडूमध्ये केस अडकल्याने केस नीट झाडले जात नाही. अशावेळी बऱ्याचदा झाडूमध्ये अडकलेले केस काढण्यात आपला वेळ जातो. पण काळजी करून नका आमच्याकडे तुमच्या या समस्येसाठी भन्नाट ट्रिक आहे.

हेही वाचा – Video : फोडणी देण्यापूर्वी तेलात टाका गरम पाणी आणि मीठ; ‘ही’ सोपी ट्रिक करेल कमाल!

हेही वाचा – गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!

तुम्हाला फार काही कष्ट घ्यायचे नाहीत. तुम्ही घर झाडून काढल्यानंतर झाडूमधून फक्त सेफ्टी पीन फिरवा. झाडूमध्ये अडकलेले बारीक केस पीनसह बाहेर येतील. ते गोळा करून कचऱ्यात टाकून द्या. तुम्ही सेफ्टी पीनऐवजी काडीपेटीतील काडी देखील वापरू शकता. तुमचा झाडू स्वच्छ ठेवल्यास तुमचे काम नक्कीच सोपे होईल आणि घरात सर्वत्र पसरलेल्या केसांपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)