Hair Care Tips: शिककाई ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून तिला आयुर्वेदातही विशेष स्थान मिळाले आहे. शिकाकाईचा वापर केसांवर शतकानुशतके केला जात आहे. या औषधी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत जे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. शिकाकाईचे चमत्कारिक फायदे आपण आपल्या आजी कडून देखील अनेकदा ऐकले असतील. हिवाळ्यात केसांच्या समस्या अधिक सामान्य असतात, परंतु पावसाळ्यात केसांचा गुंता बनून, केस तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शिकाकाईचा वापर केल्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. शिकाकाई कशी वापरायची आणि त्याचे काही आश्चर्यकारक फायदे येथे पहा.
केसांवर शिकाकाई पावडर कशी लावायची
केस पांढरे होणे थांबवा
पांढरे केस हे खूपच त्रासदायक आहे कारण ते तुमचे वय कमी करते, आजकाल बरेच लोक अकाली केस पांढरे होण्याने त्रासलेले आहेत. शिककाई केवळ केस अकाली पांढरे होण्यापासून रोखत नाही तर काळ्या केसांचे सौंदर्य देखील टिकवून ठेवते. यासाठी आठवड्यातून एकदा शिकाकाई, आवळा पावडर यांचा हेअर पॅक केसांना लावा. यांने केस अकाली पांढरे होणार नाहीत.
( हे ही वाचा: Hair Care Tips : अशाप्रकारे करा आवळ्याचा वापर; केस बनतील दाट आणि मजबूत)
मऊ-चमकणारे केस
शिकाकईमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक घटक असतात. जे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. हे केसांचे कूप साफ करते, केस चिकट होऊ देत नाही, तुमचे केस मऊ आणि चमकदार ठेवते. केसांवर वापरण्यासाठी शिकाकाई पावडर घ्या आणि नंतर त्यात पाणी घाला आणि चांगली पेस्ट बनवा. आता त्यात मध आणि थोडे पाणी घाला. चांगले मिसळा आणि नंतर ही पेस्ट केसांना लावा. काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो.
पाहा व्हिडीओ –
चमकदार आणि गडद केस
यासाठी १ चमचा तूप, आवळा, रेठा आणि शिकाकाई चांगले मिसळा. ते तुमच्या टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा. ३० मिनिटे हे असंच तुमच्या केसांवर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. हा हेअर पॅक डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी आणि तुमचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी प्रभावीपणे काम करतो.
( हे ही वाचा: Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी! ‘या’ टिप्स करा फॉलो)
शिकेकाईचे फायदे
१) कोंडा निघून जातो
शिकाकाईमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात जे कोंडाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय, ते मृत त्वचेच्या पेशी तयार होणे आणि केसांची मुळे गळणे यासारख्या समस्यांना प्रतिबंध करतात.
२) टाळूच्या आरोग्याला प्रोत्साहन देते
नवीन केसांची वाढ निरोगी टाळूवर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी शिकाकईच्या वापराने जिवाणू आणि बुरशीजन्य संक्रमणांवर उपचार केले जाऊ शकतात. टाळूचे आरोग्य सुधारते, जळजळ कमी होते आणि टाळूची पीएच पातळी राखली जाते, ज्यामुळे केसांच्या वाढीसही मदत होते.
( हे ही वाचा: तुमचे केस देखील कमी वयात गळतायत ? ही ७ प्रमुख कारणे जाणून घ्या)
३) केस चमकदार बनवतात
शिकेकाईचे तुरट गुणधर्म केसांची चमक वाढवण्यास मदत करतात. केसांची निगा राखण्यासाठी शिककाईचा वापर करून केसांमधला घाम काढून केस चमकदार आणि सुंदर बनवू शकता.