आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. त्यामुळे कमी वयात अनेकजणांना वेगवेगळे आजार होत आहेत. अशात निरोगी राहण्यासाठी व्यायाम, डाएट यांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी महिला सतत अधिक पौष्टिक जेवण बनवण्याचा प्रयत्न करतात. पण काहीवेळा आपल्या काही चुकांमुळे भाज्यातील पौष्टिकता कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी स्वयंपाक करतानाच्या काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याचा भाज्या अधिक पौष्टिक करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाज्या आणि फळं कापायची पद्धत
जर तुम्हाला फळं आणि भाज्या अधिक पौष्टिक राहाव्या असे वाटत असेल तर फळं किंवा भाज्या खूप लहान आकारात कापू नका. लहान आकारात कापल्याने त्यांमधील पौष्टिक मूल्य कमी होतात.

Navratri Diet Tips : मधूमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

घरगुती लाल मिरची
भाज्यांमध्ये घरगुती लाल तिखट घातल्याने त्याची चव सुधारते आणि रंगदेखील छान येतो. म्हणून मसाला तयार करण्यासाठी घरीच मिरच्या सुकवून वाटून मसाला बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे भाजी अधिक पौष्टिक होईल.

हिरव्या भाज्या शिजवातानाचे भांडे झाका
हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवल्या पाहिजेत जेणेकरून त्यातील जीवनसत्त्वे वाफेसह निघुन जाणार नाहीत.

नॉन-स्टिक पॅन जास्त गरम करू नका
जर तुम्ही नॉन-स्टिक पॅन जास्त गरम करत असाल तर तसे करणे टाळा. पॅन ३ मिनिटांपेक्षा जास्त गरम करू नका. कारण यामुळे भाज्यांमधील पौष्टिकता कमी होण्याची शक्यता असते.

Platelets Foods : ही फळं आणि भाज्या आहेत प्लेटलेट्सचे नैसर्गिक स्रोत; पाहा यादी

डाळ शिजवताना पाणी जास्त झाल्यास सुप बनवा
अनेकदा डाळ शिजवताना पाणी जास्त झाल्याने ती वापरायची कशी असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही त्याचे सुप बनवु शकता. त्यात भाज्या घालून तुम्ही पौष्टिक सुप बनवू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)