केसांचा नैसर्गिक रंग बदलून आपल्या आवडत्या रंगांमध्ये केस रंगवल्यावर तुमच्या दिसण्यात कमालीचा फरक पडतो. पण, सतत केसांचा रंग बदलताना या काही महत्वाच्या गोष्टी विसरून चालणार नाहीत. कारण या गोष्टींवर तुमच्या केसांचं, केसांच्या मुळांचं आणि डोक्यावरील त्वचेचं आरोग्य अवलंबून आहे. आता केस रंगवण्याआधी किंवा केस रंगवल्यानंतर त्या केसांची जादू कायम ठेऊन त्या रंगाचा केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर परिणाम होऊ नये, यासाठी काय करावं? याच्या टिप्स सांगणार आहोत.

डॉक्टर हरोर्स वेलनेसच्या मुख्य डर्मिटोलॉजिस्ट [chief dermatologist], कॉस्मॅटिक आणि केस प्रत्यारोपणाच्या सर्जन [cosmetic and hair transplant surgeon], डॉक्टर नवनीत हरोर [Dr Navnit Haror] म्हणतात की, “केस रंगवण्याचे तीन प्रकार असतात. त्यामध्ये कायमस्वरूपी, काही काळासाठी, तर तात्पुरते असे केस रंगवून घेतले जातात. प्रकार कुठलाही असला तरी केस रंगवताना, केसांचा नैसर्गिक रंग बदलण्यासाठी रसायनांचा वापर हा होतोच. त्यामुळे शेवटी या रंगांचा परिणाम तुमच्या केसांवर होतोच.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

डॉक्टर हरोर यांनी केस रंगवण्याने केसांवर आणि डोक्याच्या त्वचेच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे सांगितले आहे, ते पाहा.

हेही वाचा : हृदय आणि मेंदू दोन्ही नसूनही सर्वांत बुद्धिमान आहे जेली फिश! नक्की वाचावी अशी माहिती….

केसांची रचना बदलते :

केस वारंवार रंगवल्याने केसांच्या रचनेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. केसांच्या बाह्य आवरणावर त्याचा परिणाम झाल्याने केस कोरडे होतात. केसांच्या कोरडेपणामुळे, त्यांची चमक जाऊन ते निस्तेज होतात.

नैसर्गिक तेलांचा अभाव : हेअर डायमध्ये भरपूर रसायने असतात. ही रसायनं तुमच्या केसांमध्ये असलेलं नैसर्गिक तेल कमी करते, ज्यामुळे केस कोरडे आणि राठ होतात. परिणामी त्यांच्या तुटण्याचे प्रमाण वाढते.

ॲलर्जी होणे :

हेअर डायमध्ये असणाऱ्या घटकांमुळे डोक्याला खाज सुटणे, त्वचा लालसर पडणे अशा समस्या उद्भवू शकतात; तर काहींना या ॲलर्जीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

केस रंगवल्याने केसांमध्ये असलेल्या प्रोटीनवरदेखील याचा परिणाम होतो, ज्यामुळे केसांच्या गळण्याचे प्रमाण वाढते. असं तेलंगणामधील डर्मिटोलॉजिस्ट, डॉक्टर निशित रांका [Dr Nishita Ranka] यांनी सांगितलं. डॉक्टर रांका यांच्या म्हणण्यानुसार, “हेअर डायमध्ये असणाऱ्या अनेक घटकांपैकी, अल्कधर्मी/ अल्कलाईनचा, केसांमध्ये असणाऱ्या ‘केरेटिन’सारख्या महत्वाच्या घटकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वारंवार केस रंगवल्याने केसांवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. केस नाजूक, कमकुवत बनतात. परिणामी केस तुटण्याचे, गळण्याचे प्रमाणदेखील वाढते.”

“काही वेळेस तुम्ही केस रंगवताना भरपूर केमिकल असणाऱ्या हेअर डायचा वापर करत असाल किंवा केसांना ब्लिच करत असाल तर या प्रक्रियेमुळे केस प्रचंड गळतात, पातळ होतात”, असंदेखील त्या म्हणाल्या.

पण, जर तुम्हाला केस रंगवायचे असतील किंवा तुम्ही ते रंगवले असतील तर त्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं? याच्या टिप्स ‘२.ओह!’ च्या सह-संस्थापक रितू विजयवर्गीय [Ritu Vijayvergiya] यांनी सांगितल्या आहेत.

रंगवलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी?

१. चांगल्या दर्जाच्या शाम्पूचा वापर करा. शाम्पू केल्यानंतर कंडिशनरचा उपयोग करा.

२. केसांसाठी लिव्ह इन कंडिशनरचा वापर करा. त्याचसोबत केसांची काळजी घेणारे सिरमदेखील वापरा.

३. केसांचं चांगलं पोषण व्हावं यासाठी, आठवड्यातून एकदा तरी केसांमध्ये खोलवर जाऊन त्यांचं पोषण करणाऱ्या कंडिशनर मास्कचा वापर करा.

४. केसांवर जर कुठल्याही प्रकारच्या गरम साधनांचा [hair straightener] वापर करणार असाल, तर केसांचा उष्णतेपासून बचाव करणाऱ्या घटकांचा वापर करा.

५. जर तुमचे केस नाजूक असतील, सहज तुटणारे असतील तर केसांची व्यवस्थित काळजी घेऊन काम करणाऱ्या हेअरस्टायलिस्टकडे जा.

६. दिवसा बाहेर जाताना केसांचं उन्हापासून रक्षण करा. त्याचसोबत योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. याने तुमच्या केसांसोबत, तुमचं शरीरदेखील निरोगी राहील.

केस रंगवताना कोणती काळजी घ्यावी?

१. केस रंगवताना दरवेळी ब्लिचचा वापर टाळा. ब्लिचचा अति वापर केल्याने तुमचे केस लवकर आणि जास्त प्रमाणात खराब होतात.

२. केस रंगवताना विविध प्रकारच्या, पण काही वेळापुरते टिकणाऱ्या [semi-permanent] रंगांचा वापर करून तुम्हाला हव्या तेवढ्या रंगांसोबत प्रयोग करून बघा. या रंगांचा वापर करताना, केसांना सतत ब्लिच करण्याची आवश्यकता नसते.

३. एकदम एका रंगावरून दुसऱ्या रंगावर उडी मारू नका. हळू हळू आपल्या केसांच्या रंगात बदल करा.

४. तुमच्या केसांना, तुम्हाला अपेक्षित असलेला रंग हवा असल्यास केस रंगवण्याचं काम दोन भागांमध्ये करा. याने तुम्हाला हवा असलेला रंगसुद्धा मिळेल आणि केसांवर ताणदेखील येणार नाही.

५. तुमच्या केसांची काळजी घेणारे प्रॉडक्ट वापरा. यामुळे ब्लिच करताना किंवा केस रंगवताना त्यांची फार हानी होणार नाही.

६. केस रंगवल्यानंतर त्यावर ताबडतोब गरम साधनांचा [hair straightener] वापर टाळल्याने तुमच्या केसांची इजा कमी होईल.