मधुमेह नावातच गोडवा असणारा परंतु आयुष्यातील गोडी कमी करणारा आजार. दुर्दैव असे की हा आजार जगभरात अक्राळ-विक्राळपणे पाय पसरत आहे आणि भारतात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अलीकडे तर अगदी तरुण वयोगटालाही या आजाराने ग्रासले असून यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब या आजारांनाही घेऊन येत आहे. ग्लुकोज वाढते ते रक्तात आणि रक्त सर्व शरीरात फिरते. त्यामुळे साहजिकच शरीरातील अनेक इंद्रियांनाही याचा उपद्रव होतो.
ज्या लोकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक आहे त्यांना अनेक औषधे घ्यावी लागतात. आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण आटोक्यातही आणू शकतो. डॉक्टरने सांगितलेली औषधे आणि आपल्या जीवनशैलीतील बदलांसोबतच काही मसाले आणि औषधी वनस्पतींच्या सेवनाने आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणू शकतो. जाणून घेऊया या औषधी वनस्पती आणि मसाल्यांबाबत.
उच्च रक्तदाब ते मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे अंजीर; जाणून घ्या इतर फायदे
कडुनिंब (Neem)
कडुलिंब, ही एक अशी नैसर्गिक औषधी वनस्पती, जी त्याच्यातील आश्चर्यकारक औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून ते दात आणि त्वचेची काळजी घेण्यापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. कडुनिंबात फ्लेव्होनॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि ट्रायटरपेनॉइड्स देखील असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
आले (Ginger)
आल्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. हे शरीराला आतून गरम ठेवते. आरोग्य तज्ञांच्या मते, आले इंसुलिन स्राव नियंत्रित करण्यासही मदत करते. कच्चे आले किंवा सुंठ जास्त गुणकारी असते. परंतु त्याचे जास्त सेवन केल्याने पोटासंबंधी तक्रारी जाणवू शकतात.
मेथी (Fenugreek)
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मेथी खूप गुणकारी आहे. हे शरीरातील ग्लुकोज सहनशीलता सुधारण्यास मदत करते. यामध्ये विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात असते जे पचनक्रिया मंद करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना दररोज १० ग्रॅम मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो.
Health Tips : हिवाळ्यात वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; आजच बंद करा ‘या’ सवयी
दालचिनी (Cinnamon)
हा एक असा मसाला आहे जो जेवणाच्या स्वादाला वाढवण्याचे काम करते. दालचिनीच्या दैनंदिन सेवनाने मधुमेह दूर ठेवण्यास मदत होते. हे इंसुलिनच्या क्रियाकलापांवर परिणाम करते आणि इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते. तुम्ही चहा बनवून किंवा पाण्यात उकळूनही पिऊ शकता.