केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण तरीही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासुन मजबुत करणे गरजेचे असते. त्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया.
Beauty Tips : डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? हे घरगुती उपाय करून पाहा नक्की मिळेल फायदा
केसांना मुळापासुन मजबुत करण्यासाठी घरगुती उपाय
- केसांना लांब, दाट, आणि मजबुत बनवण्यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा.
- कांदा वाटून त्याचा दोन चमचे रस काढून घ्या. हा रस केसांच्या मुळांवर लावा, याने लगेच फरक जाणवेल.
- एलोवेरा केसांसाठी गुणकारी मानले जाते. केसांना लावण्यासाठी एलोवेरा वापरले जाते. तसेच काहीजण याचे सेवनदेखील करतात. एलोवेरा केस मजबुत करण्यास मदत करते.
- आठवड्यातून दोन वेळा एरंडेल तेलाने केसांची मालिश करा. यामुळे केसगळती कमी होईल.
- रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलने केसांची मालिश केल्यास केसांना सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळतात.
- केसांमध्ये केळ्याची पेस्ट बनवून लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.
- आठवड्यातून एकदा एलोवेरा मध्ये अंडे मिसळून केसांना लावल्याने केस मुळांपासुन मजबूत होतात.
- एरंडेलच्या तेलात विटामिन ई चे कॅप्सूल मिसळुन केसाला लावल्याने केस मजबुत होतील.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)