बहुतांश लोक डार्क सर्कल्सच्या म्हणजेच डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांच्या समस्येने त्रस्त असतात. पुरेशी झोप न घेणे, तणाव, रात्री उशीरापर्यंत लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर यांमुळे डार्क सर्कल्स वाढु शकतात. डार्क सर्कल्स जास्त वाढले असतील तर आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी संकोच वाटतो. मग एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना डार्क सर्कल्स लपवण्यासाठी मेकअपचा आधार घ्यावा लागतो. पण काही जणांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते, ज्यांना सतत मेकअप केल्याने एलर्जी होण्याची शक्यता असते. अशावेळी डार्क सर्कल्स घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. कोणते आहेत ते घरगुती उपाय जाणून घेऊया.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक
डार्क सर्कल्सवरील घरगुती उपाय
- डार्क सर्कल्सवर बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो. किसलेल्या बटाट्याचा रस काढून, तो रस डोळ्यांखाली लावा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.
- टी बॅग डार्क सर्कल्स घालवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. यासाठी टी बॅग गरम पाण्यात एका मिनिटासाठी भिजत ठेवा. त्यानंतर टी बॅग थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. दिवसातून दोन वेळा अशी टी बॅग डोळ्यांखाली ठेवा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतील.
- बदामाचे तेलदेखील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी बदाम तेल डोळ्यांखाली लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तेल डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
- काकडीचे गोल तुकडे करून ते १० मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर हे तुकडे काढून तोंड धुवून घ्या.
- गुलाब पाणी देखील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी कापसाच्या बोळ्याने गुलाब पाणी डोळ्यांखाली लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. असे केल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)