Hair Oil For Monsoon: पावसाळ्यात केस गळणे आणि कोंडा होण्याच्या समस्येने लोक त्रस्त असतात. या ऋतूतील आर्द्रतेमुळे हा त्रासही जास्त वाढतो. आर्द्रतेमुळे लोक केसांना तेल लावणे बंद करतात पण असं मुळीच करू नका. पावसाळा असल्याने केसांना तेल लावणे कधीही थांबवू नका. खरं तर, या ऋतूतही, रोजच्या तेलामुळे तुमचे केस निरोगी आणि फ्रिज-फ्री राहू शकतात. पावसाळ्यात केसांना लावलेले तेल तुमच्या केसांमधील खाज आणि ड्राई स्कैल्प पासून सुटका करते. याशिवाय तुमच्या केसांमधील कोंडा आणि केसगळती देखील भरपूर प्रमाणात कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात देखील केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावले पाहिजे. तर जाणून घ्या पावसाळ्यात केसांना कोणते तेल चांगले आहे आणि त्याचा वापर कसा करावा.
१) खोबरेल तेल
खोबरेल तेल तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. त्यात आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि प्रथिने असतात जे तुमच्या टाळूचे खोलवर जाऊन पोषण करतात आणि तुमचे केस मजबूत करतात. नारळाचे तेल तुम्हाला कोरड्या आणि कुरळ्या केसांचा सामना करण्यास देखील मदत करू शकते, जी पावसाळ्यात एक सामान्य समस्या आहे. याशिवाय खोबरेल तेल तुमचे केस फ्रिज-फ्री देखील ठेवते. यामुळे आठवड्यातून २ वेळा खोबरेल तेल गरम करून केसांना लावा आणि चांगला मसाज करा.
पाहा व्हिडीओ –
( हे ही वाचा: मुलायम आणि चमकदार केसांसाठी शिकाकाई वापरा; जाणून घ्या त्याचे फायदे)
२) ट्री हेअर ऑइल
ट्री हेअर ऑइल पावसाळ्यात केसांना आवश्यक असते. कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ट्री हेअर ऑइल त्याच्या अँटीव्हायरल गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे, जे तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेऊ शकते. तसंच हे कोरड्या आणि निर्जीव केसांवर सहज उपचार करते. याशिवाय . ट्री हेअर ऑइल लावल्याने तुमच्या केसांमधील कोंडा किंवा टाळूवरील खाज बऱ्याच प्रमाणात कमी होते. यामुळे या तेलाचा आठवड्यातून २ वेळा तरी केसांना वापर केल्यास, याचा चांगला फायदा मिळतो.
३) मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेवर आणि टाळूवर रक्त प्रवाह सहज वाढतो. केसांवर मोहरीचे तेल वापरावे कारण त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यासाठी थोडं मोहरीचं तेल गरम करा आणि त्यानं टाळूला मसाज करा. आपले केस कोमट टॉवेलने काही वेळ झाकून ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. याने तुमच्या केसांना नक्कीच चांगले पोषण मिळेल. तसंच केसांसंबंधित समस्याही नाहीशा होतील.
( हे ही वाचा: Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी! ‘या’ टिप्स करा फॉलो)
४) बदाम तेल
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते आणि ते त्वचा आणि केसांसाठी देखील खूप चांगले आहे. टाळूवर बदामाचे तेल वापरल्याने केसांचे कूप मजबूत होऊ शकतात. तसंच कोरडे केसांची समस्या बदाम तेलामुळे भरपूर प्रमाणात कमी होते. तुमच्या टाळूची मसाज करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून लावू शकता, ज्यामुळे तुमचे केस निरोगी, हायड्रेटेड आणि मऊ होतील.