आपण आकर्षक दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. आकर्षक दिसण्यामध्ये दाट केस मदत करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती केसांची विशेष काळजी घेण्याच्या प्रयत्न करतात. अशात वेगवेगळे महागडे प्रोडक्टस वापरून केसांची काळजी घेतली जाते. पण असे काही केमिकलयुक्त प्रोडक्टसचा सतत वापर केल्याने त्याचे केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा अतिवापर टाळण्याचा सल्ला तज्ञ देतात. मग जर जास्त केसगळती होत असेल आणि त्यामुळे टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर काय करावे असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी काही उपाय वापरून तुम्ही टक्कल पडण्याच्या भीतीपासून मुक्तता मिळवू शकता कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया.
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने केसगळती कमी होण्यास मदत मिळु शकते. हेअर फॉलिकल्स प्रोटीनयुक्त पदार्थांपासून बनतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी प्रोटीन फायदेशीर मानले जाते. यासाठी तुम्ही मासे, अंडी आणि कमी चरबी असणारे मांस असे प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
आणखी वाचा : झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की दिसेल फरक
योग्य जीवनसत्वांचा आहारात समावेश करा
केसांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात योग्य जीवनसत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए टाळूवरील सिबम (नॅचरल ऑइल) साठी महत्त्वाचे मानले जाते. तसेच व्हिटॅमिन इ टाळूमधील रक्तप्रवाह सुरळीत चालु ठेवण्यास मदत करतात. केसांच्या वाढीसाठी या जीवनसत्वांचा आहारात समावेश करा.
घरगुती उपाय
अनेक वेळा आपल्या समस्यांवरील उपाय घरातच उपलब्ध असतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जर तुम्ही केसगळतीमुळे त्रस्त असाल आणि टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर त्यावर एक घरगुती उपाय करू शकता. लसूण, आले आणि कांद्याच्या मिश्रणाने मसाज करू शकता. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा आणि सकाळी उठल्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय काही आठवडे केल्याने केस पुन्हा दाट येण्यास मदत होईल.
आणखी वाचा : हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत काही बाबतीत गुणकारी ठरणारा कांदा खाल्ल्याने होऊ शकतात हे अपाय; लगेच जाणून घ्या
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)