आपण नेहमी तरुण दिसावं असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी फिट राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करणे, जास्त व्यायाम करणे अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, दाग अशा समस्या उद्भवतात. वयाच्या चाळीशीनंतर अशा समस्या उद्धवू शकतात. अशात प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा आधीसारखी तजेलदार दिसावी, त्वचा ग्लो करावी असे वाटत असते. यासाठी तुम्हाला स्किन रुटीनबरोबर आणखी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरकुत्या, दाग या समस्या काही उपाय करून टाळता येऊ शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्वचा निस्तेज होण्याची कारणं
अयोग्य आहार, धुम्रपान, तणाव, प्रदूषण या कारणांमुळे त्वचा निस्तेज होऊ शकते. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे कठीण जाते. तरीही त्यांनी दैनंदिन दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केल्याने त्यांची त्वचा पुन्हा ग्लो करू शकेल. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही फक्त ब्युटी प्रोडक्ट्सचाच वापर केला पाहिजे असे नाही, तर काही सवयी जर तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवल्या तर तुमची त्वचा तजेलदार राहते.

Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

तणावापासून दूर राहा
सहसा महिला एकाच वेळी अनेक कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना तणाव येणे साहजिक आहे. घर आणि ऑफिस सांभाळताना स्त्रियांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. तणावाचा केसांवर आणि त्वचेवरही खूप वाईट परिणाम होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आनंदी असणे महत्वाचे आहे, यामुळे तुमची त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसेल आणि तुम्हाला कोणत्याही ब्युटी प्रोडक्टची गरज भासणार नाही.

नैसर्गिक फेस वॉश
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस वॉश अत्यंत आवश्यक ठरतो, त्यातही नैसर्गिक फेसवॉशला प्राधान्य द्यावे. तुमच्या त्वचेचा प्रकारानुसार फेसवॉशची निवड करा, ज्यामुळे तुमच्या त्वचेशी निगडित समस्या दूर करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पपई, काकडी यांसारख्या नैसर्गिक फेसवॉशचा वापर केल्याने चेहऱ्यावर ग्लो राहतो तसेच पिंपल्स येत नाहीत.

अँटी-एजिंग क्रीम

एका विशिष्ट वयानंतर रात्रीच्या वेळी आपल्या स्किन रुटीनमध्ये अँटी-एजिंग क्रीम समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या वेळी सामान्य मॉइश्चरायझरऐवजी अँटी-एजिंग क्रीम वापरल्याने त्वचेवर ग्लो राहण्यास तसेच सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

आणखी वाचा : झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की दिसेल फरक

धुम्रपान टाळा

अनेक महिलांनाही धुम्रपानाची सवय असते, जर तुम्हालाही अशी सवय असेल तर ही सवय त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. धुम्रपानामुळे रक्तवाहिन्या लहान होतात, त्यामुळे त्वचेमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे तुमची त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू शकते.

सनस्क्रीनला रुटीनचा भाग बनवा
जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल तर तुम्ही नियमित सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, पिंपल्स आणि त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्याही कमी होऊ शकतात. उन्हात बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरावे असे गरजेचे नाही, तुम्ही घरी असाल तरीही त्वचेवर सनस्क्रीन लावा.

Skin Care Tips : तेलकट त्वचेवर करा ‘हे’ घरगुती उपाय; लगेच दिसेल फरक

भरपूर पाणी प्या
त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि ग्लो करणारी असावी असे वाटत असेल, तर त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा मॉइश्चराइज आणि निरोगी राहते. जर तुमची त्वचा मॉइश्चराइज आणि निरोगी राहिली तर त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करेल. दिवसभरात किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)