आजकाल अनेकजण कुत्रा, मांजर किंवा त्यांच्या आवडीचे प्राणी पाळतात. या प्राण्यांना घरातील सदस्याप्रमाणेच प्रेम दिले जाते, त्यांची काळजी घेतली जाते. हे प्राणी देखील घरातल्या सदस्यांवर खुप प्रेम करतात. अशी बरीच उदाहरणं तुम्ही पाहिली असतील किंवा तुम्ही देखील एखादा प्राणी पाळला असेल तर घराबाहेर जाताना त्याची काळजी तुम्हालाही वाटत असेल. बहुतांश घरात स्त्री आणि पुरुष दोघंही कामावर जातात, त्यामुळे जर घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर तो घरात दिवसभर एकटाच असतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या टिप्स वापराव्या जाणून घ्या.
पाळीव प्राण्यांना घरी एकटं सोडून जाताना या टिप्स वापरा
घरी एकटं सोडण्यापुर्वी त्यांना बाहेर फिरवून आणा
कुत्रा किंवा मांजर अशा पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला खुप आवडते. तसेच बाहेर गेल्यावर खेळल्यामुळे त्यांना थकवा येऊ शकतो आणि ते घरी आल्यानंतर जास्त खेळणे किंवा फिरणे टाळतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापुर्वी पाळीव प्राण्यांना बाहेर फिरवून आणा, यामुळे ते घरात जास्त दंगा न करता एका ठिकाणी खेळत राहतील.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
भरपुर खेळणी द्या
प्राण्यांना दिवसभर व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना भरपुर खेळणी द्या, यामुळे ते दिवसभर त्याच्याबरोबर खेळत राहतील आणि घरातील इतर वस्तुंना हात लावणार नाहीत.
त्यांना घरात कसे वावरायचे याचे प्रशिक्षण द्या
जर तुम्ही पाळीव प्राणी घरात सोडून दिवसभर कामावर जाणार असाल, तर तुम्हाला त्यांना आधी घरात कस वावरायचं याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तुम्ही किचन सारख्या धोकादायक जागी न जाण्याचे प्रशिक्षण त्यांना देऊ शकता.
पाणी आणि खाऊ त्यांच्याजवळ ठेवा
जर तुम्ही घरी नसताना तुमच्या प्राण्याला तहान किंवा भूक लागली तर ते अस्वस्थ होऊ नये किंवा ते शोधण्यात घरातील वस्तुंची उलथापालथ करू नये यासाठी त्यांच्याजवळ पाणी आणि खाऊ ठेऊन जा.
आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
रुटीन बनवा
कुत्रा किंवा मांजर यांना घरी एकटं राहण्यात अडचण येणार नाही, पण तुम्ही त्यांना त्यांची सवय लावणे गरजेचे आहे. यासाठी त्यांचे रुटीन बनवा आणि ते फॉलो करा. यामुळे घरात एकटं राहण्याची त्यांना सवय होईल.