बऱ्याच वेळा अभ्यास करताना किंवा काम करत असताना आपल्याला झोप येते. याचे कारण म्हणजे बराच वेळ आपण एका ठिकाणी बसून राहतो म्हणुन असा कंटाळा येणे शक्य आहे. पण ऑफिसमध्ये असताना कामावर लक्ष केंद्रित करणे किंवा अभ्यास करत असताना पुर्ण लक्ष अभ्यासावर ठेवणे आवश्यक असते. अशात जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर काही उपाय करून तुम्ही या आळसापासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पौष्टिक आहार निवडा
तज्ञांच्या मते झोप टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. जर आपण जास्त तळलेले किंवा चरबीयुक्त अन्नपदार्थ खाल्ले तर त्यामुळे सुस्ती येण्याची शक्यता असते. कामाच्या दरम्यान झोप येऊ नये म्हणून सूप व सॅलड्स, मसूर, भरपूर फळे, भाज्या यांसारख्या पोषक आणि फायबरने समृद्ध असा आहार घ्यावा.

आणखी वाचा : झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की दिसेल फरक

पॉवरनॅप घ्या
अभ्यासासाठी किंवा कामासाठी अनेक तास एकाच जागी बसल्यावर झोप येणे साहजिक आहे. अशावेळी तुम्ही पॉवरनॅप घेऊ शकता. पॉवर नॅप तुमच्यासाठी एनर्जी बूस्टर ठरेल. यामुळे तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल.

पुरेसे पाणी प्या
पुरेसे पाणी न प्यायल्याने काम करताना किंवा अभ्यास करताना झोप येऊ शकते. एका अभ्यासानुसार, कमी पाणी प्यायल्याने आळस येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे

चालणे
ऑफिसमध्ये काम करत असताना किंवा अभ्यास करत असताना मध्ये थोडा ब्रेक घेऊन तुम्ही चालू शकता, यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

चहा किंवा कॉफी
झोप टाळण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते हे झोप उडवण्यासाठी गुणकारी मानले जाते. पण लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात चहा-कॉफी प्यायल्यानेही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मर्यादित प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)